उल्हासनगर दि. ४ ( प्रमोद दळवी ) : पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भारतीय जनता पक्षाच्या दणदणीत विजयाचा जल्लोष उल्हासनगर शहरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

आमदार कुमार आयलानी आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते भाजपच्या जिल्हा कार्यालयात मोठ्या संख्येने एकत्र जमून या विजयाचा आनंद साजरा केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई व रसगुल्ले वाटून, ढोल ताशाच्या तालावर नाचत गाजत व फटाके फोडून या विजयचा आनंद व्यक्त केला.. ‘भारत माता की जय’ आणि ‘मोदी है तो मुमकिन है’ यांसारख्या घोषणा संपूर्ण परिसरात घुमत होत्या. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि जल्लोष दिसून येत होता.

याप्रसंगी आमदार कुमार आयलानी यांनी सर्व कार्यकर्त्यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आणि सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने स्थिरपणे प्रगती करत आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, हा जनतेचा पाठिंबा भविष्यात पक्षाला आणखी मजबूत करेल. कार्यक्रमाच्या शेवटी, सर्वांनी एकत्र येऊन पक्षाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्याची शपथ घेतली. माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, नगरसेवक, महिला आघाडी, युवा आघाडी आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते





























