Homeशहरब्रह्मांड, ठाणे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या...

ब्रह्मांड, ठाणे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली

ठाणे दि १९ : दिनांक १३ रोजी रात्री साडेअकरा वाजता आतिषबाजी करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले व बुद्धवंदना घेण्यात आली.दिनांक १४ रोजी सकाळपासून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सकाळी ९ वाजता प्रमुख पाहुणे आयुष्यमान राजू राजेश कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पुन्हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत माने, प्रदीप मून, महेंद्र देशमुख, प्रकाश कांबळे, राजेश जाधव आणि अनिल आठवले यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर स्पर्श फाउंडेशनच्या अध्यक्षा महेंद्र मढवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी सामूहिक बुद्धवंदना केली.

विचारमंचावर प्रमुख पाहुणे आयुष्यमान राजेश कांबळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी आजच्या पिढीला बाबासाहेबांचे विचार समजावून सांगत, आरक्षण, हक्क, अधिकार आणि सामाजिक न्याय याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच बाबासाहेबांची जयंती केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर साजरी केली जाते, अमेरिकेसारख्या बलाढ्य देशातही त्यांना अभिवादन केले जाते, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. उपस्थित मान्यवरांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था द बुद्धिस्ट वेल्फेअर असोसिएशनतर्फे करण्यात आली होती. तसेच महिलांसाठी विविध खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष्यमती दीपाली घडे यांनी केले. सहभागी स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

सायंकाळी कराओके कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आयुष्यमान प्रदीप मून यांनी प्रायोजित केला होता. “बोल बा हिमाचे” या सुरेल गीताने संपूर्ण ब्रह्मांड परिसर संगीतामय झाला. तसेच परिसरातील मुलींनी सुंदर नृत्याविष्कार सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमानंतर बक्षीस वितरण करण्यात आले. द बुद्धिस्ट वेल्फेअर असोसिएशनतर्फे प्रत्येकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांची प्रतिमा असलेला विशेष चहाचा मग भेट देण्यात आला. त्या मगावर वेल्फेअर असोसिएशनचे नाव कोरलेले होते.

सदर कार्यक्रमास शिक्षक आमदार आदरणीय निरंजन डावखरे साहेब, स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे, विकास पाटील, सामाजिक कार्यकर्ते नितीन कांबळे, राजेश जाधव तसेच नगरसेविका कमल चौधरी यांनी उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले. याशिवाय ब्रह्मांड परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी द बुद्धिस्ट वेल्फेअर असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी अत्यंत उत्कृष्टरीत्या पार पाडली. त्यांच्या सहकारी बांधवांनीही संपूर्ण सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न केला.मा. आयुष्यमान रामदासजी आठवले (केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री) यांनी मंडळाला शुभेच्छापत्र देऊन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

तसेच ज्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते, त्या ठिकाणाला “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चौक” असे नामकरण करण्यात आले. या नामकरणाचे उद्घाटन आदरणीय निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मनोहर डुंबरे आणि विकास पाटील यांच्या उपस्थितीत या चौकाचा नामकरण सोहळा उत्साहात पार पडला. त्यासोबतच सावित्रीबाई फुले वृत्तपत्र वाचनालय संपूर्णपणे मोडकळीस आलेले होते. त्या वाचनालयाचे नूतनीकरण करून त्याचे आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी वाचनालय अधिक सुस्थितीत, सुंदर आणि उपयुक्त बनले असून सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना नवसंजीवनी मिळाली आहे.

याचप्रमाणे सावित्रीबाई फुले वृत्तपत्र वाचनालय या ठिकाणीही “वाचनालय चौक” असे नामकरण करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक ओळख अधिक दृढ झाली असून नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले. डॉ. आफळे आय हॉस्पिटल, ठाणे यांच्या तर्फे सर्वांसाठी विशेषतः मोफत नेत्र तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारा ठरला.

चंद्रकांत माने (अध्यक्ष), अनिल आठवले (सचिव), पांडुरंग पाटेकर (उपाध्यक्ष), सुभाष केदारे (खजिनदार), प्रकाश कांबळे (सह सचिव), नितीन मनोहर कांबळे, डॉ. प्रमोद कोलगे, सचिन साळवे, प्रदीप मून सर, मोहन कृष्णाजी भालेराव, सुहास बनसोडे, सुनील बागुल, सर्जेराव कंठे, सुधाकर गायकवाड, आयुष्यमती तुळसाबाई भिमराव केदारे, आयुष्यमती संध्या सुभाष केदारे, आयुष्यमती प्रमिला शरद केदारे, सौ. लीला पवार, सौ. ज्योती शिंदे, सौ. विश्रांती माने, सौ. ज्योत्स्ना नितीन कांबळे, सौ. गीता पाटेकर मॅडम, सौ. सीमा आठवले, सौ. कृपाली भवार, सौ. स्नेहल पवार, सौ. माया भालशंकर, अॅडव्होकेट मानवतकर, राजू साळुंखे, श्रीकांत मोहिते, समीका मोहिते, थोरात दिलीप, सचिन चंद्रकांत माने, जयदेव पाटील, निनाद येलवे, शरद केदारे, दिलीप चंदनशिवे, ए. के. वाठोरे, अर्जुन भालशंकर, अर्जुन भालेराव, अनिता गोरखनाथ बैले, सनी संजय माने, अनिमेष विश्वनाथ सुखदेवे, जगदीश कांबळे, शेंडगे जी. हिरानंदानी, मोरे विशाल, सौ. दीपाली पंकज घरडे (पवार), विशाल निंबाळकर, प्रकाश मेंढे, प्रमोद शिलवंत, आनंदा देवराम साळवे, दिलीप थोरात, दिवाकर शेळके साहेब, सौ. वनीता दिवाकर शेळके, सौ. शोभा शामसुंदर कांबळे, शशिकांत खरे, चंद्रगुप्त ढोले, सूरज बोरकर, सौ. प्रफुल्ला वामन पवार, पंचशीला बढेकर, सौ. जयश्री नाडर, सौ. दिलीप पवार या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. समाजसेवक आयु. प्रशांत सपकाळे, आयु. नितीन कांबळे, आयु. महेंद्र देशमुख, आयु. महेंद्र मढवी, आयु. रविंद्र असने, प्रा. डॉ. प्रल्हाद वाघ, प्रा. बालाजी घुगे, विलास पाटील, शेख, मंगेश पाटील यांनी बाबासाहेबांना अभिवादन

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सेना (यूबीटी) एमएलसीने 90 कोटी रुपयांच्या विक्रोळी एफओबी निविदेत हेराफेरी आणि कार्टेलायझेशनचा आरोप केला...

मुंबई: शिवसेनेचे (UBT) आमदार अनिल परब यांनी रविवारी 90 कोटी रुपयांच्या विक्रोळी एफओबी निविदेत मोठ्या प्रमाणात हेराफेरी आणि कार्टेलायझेशनचा आरोप केला. परब...

AFMC डॉक्स पुणे कँट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया काळजी वाढवतात

पुणे: सरदार वल्लभभाई पटेल पुणे कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलने आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) ने आपले विशेष डॉक्टर सुविधेवर तैनात केल्यानंतर शेकडो रुग्णांसाठी...

IPL 2026: जोफ्रा आर्चरने KKR विरुद्ध इतिहास रचला, फक्त दुसरा गोलंदाज ठरला…

जोफ्रा आर्चरने दुस-या डावातील पहिल्या चेंडूवर फटकेबाजी करत रविवारी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या IPL 2026 सामन्यात मोहम्मद...

सुंदर इंडो-अरबी आणि पर्शियन बाळाची नावे भारतीय कुटुंबांमध्ये शांतपणे वापरली जातात

बाळाची नावे अनेकदा शांतपणे पसरतात, जास्त लक्ष न देता. आजी-आजोबांच्या माध्यमातून, जुन्या कवितांची पुस्तके, कौटुंबिक कथा, तर कधी फक्त आवाजातून. बऱ्याच भारतीय घरांमध्ये, इंडो-अरबी...

एनसीडब्ल्यूने परतवाडा प्रकरणातील आरोपींवर कठोर आरोपांची मागणी केली आहे

पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) अधिकाऱ्यांना अमरावतीमधील परतवाडा प्रकरणाच्या संदर्भात फॉरेन्सिक विश्लेषण जलदगतीने करण्याचे आणि दर पाच दिवसांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे...

error: Content is protected !!