Homeशहरउल्हासनगरात मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात एसटी महामंडळाचा कर्मचारी गंभीर जखमी

उल्हासनगरात मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात एसटी महामंडळाचा कर्मचारी गंभीर जखमी

उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी ): उल्हासनगर शहरात मोकाट आणि चावक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. रस्त्यावरील या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. नुकताच उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील साईनाथ नगर यादव चाळ या ठिकाणी रस्त्यावरील मोकाट कुत्र्याने एका एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करून त्याच्या पायाचा लचका तोडून त्यांना गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली आहे. त्याच परिसरात यापूर्वी देखील मोकाट कुत्र्यांनी काही जणांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना घडली होती. या मोकाट आणि चावक्या कुत्र्यांचा पालिकेने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

रस्त्यावरील मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या त्या एसटी कर्मचाऱ्यांचे नाव मनोज भाऊसाहेब मालुंजकर (४० ) असे आहे. मनोज हे उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ रिसरातील कुर्ला कॅम्प हनुमान मंदिराजवळ आपल्या कुटुंबास राहतात. ते मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळामध्ये काम करतात. ते नेहमी सकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास जिमला जात असतात. काल सकाळी सहाच्या सुमारास ते जिम वरून घरी परत येत असताना साईनाथ नगर यादव चाळ येथील रोडवरील ५ ते ६  मोकाट कुत्र्यांची टोळी बसली होती. त्या टोळीतील एका काळ्या कुत्र्याने मनोज यांच्यावर अचानक हल्ला केला. त्या कुत्र्याने मनोज यांच्या उजव्या पायाला जबरी चावा घेऊन त्यांच्या पायाचा लचका तोडला. रक्तरंजित झालेल्या अवस्थेत मनोज यांनी त्या मोकाट कुत्र्याचा प्रतिकार केल्यामुळे त्या कुत्र्याच्या तावडीतून त्यांची सुटका झाली. मनोज यांनी  त्वरित रुग्णालयात जाऊन उपचार करून घेतले आहेत. याआधी देखील हनुमान नगर मंदिर परिसर, साईनाथ नगर व यादव चाळ या ठिकाणी रस्त्यावरील मोकाट व चावक्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेऊन जखमी केले असल्याचे मनोज यांनी सांगितले आहे. उल्हासनगर महानगरपालिकेने या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा. या मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे पहाटेच्या सुमारास व रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून जाणे देखील मुश्किल झाले आहे. याशिवाय हे मोकाट कुत्री लहान मुलांना देखील चावा घेण्यासाठी पाठलाग करीत असतात. मनोज मालुंजकर यांनी या मोकाट कुत्र्या संदर्भात काहीतरी उपयोजना करण्यासाठी स्थानिक नगरसेविका अंजली साळवे व सुरेखा सुरेश सोनावणे यांच्याकडे विनंती केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

12 वर्षांच्या तुरुंगवासानंतर मुंबई न्यायालयाने अल्पवयीन बलात्कार प्रकरणात पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

मुंबई: एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी 12 वर्षे तुरुंगात घालवलेल्या 35 वर्षीय व्यक्तीची निर्दोष मुक्तता करताना एका विशेष पोक्सो न्यायालयाने डॉक्टरांच्या...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

IPL 2026: सर्वात तरुण. सर्वात वेगवान. न थांबता! वैभव सूर्यवंशी स्क्रिप्ट्स T20 इतिहास पुन्हा

आयपीएल 2026 मध्ये द वंडर किड वबिहाव सूर्यवंशी बिस्ट मोडमध्ये आहे " decoding="async" fetchpriority="high"/>द वंडर किड वबिहव सूर्यवंशी आयपीएल २०२६ मध्ये बीस्ट मोडमध्ये...

5 फॅब्रिक्स जे तुम्हाला उन्हाळ्यात थंड ठेवू शकतात

चला वास्तविक बनूया - कापूस हा प्रत्येकाचा उन्हाळा डीफॉल्ट आहे. आणि ते स्थान मिळवले आहे.हे मऊ, हलके आहे आणि हवा सहजतेने जाऊ देते, जे...

error: Content is protected !!