Homeशहरपुडुचेरी विधानसभा निवडणूक २०२६ साठी डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांची सह-समन्वयक म्हणून...

पुडुचेरी विधानसभा निवडणूक २०२६ साठी डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांची सह-समन्वयक म्हणून नियुक्ती

उल्हासनगर दि. २६ ( प्रमोद दळवी ) : ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (अल्पसंख्यांक विभाग) तर्फे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली व इमरान प्रतापगढी यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांची पुडुचेरी विधानसभा निवडणूक २०२६  साठी सह-समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ही नियुक्ती त्यांच्या संघटन कौशल्य, सामाजिक बांधिलकी आणि संविधाननिष्ठ कार्यपद्धतीवरील विश्वासाचे प्रतीक आहे. काँग्रेस नेतृत्वाने महाराष्ट्रातील एक बौद्धिक व जनआधारित नेतृत्व म्हणून त्यांच्यावर विश्वास दर्शविला आहे. डॉ. इंगळे यांनी यापूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीत जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

डॉ. प्रशांत इंगळे यांचे बालपण कन्नमवार नगर येथे गेले असून त्यांचे शालेय शिक्षण उल्हासनगर येथे झाले. डॉ. प्रशांत इंगळे त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी करत असताना त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत विजय मिळवून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. सन २००८  मध्ये UDCT (आताचे ICT, मुंबई) येथे SC/ST/OBC विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी आंदोलन तसेच शिक्षकांच्या रोस्टरनुसार बढतीसाठी त्यांनी प्रभावी लढा उभारला होता .सन २००५  पासून कल्याण विद्यापीठ उपकेंद्र स्थापनेसाठी त्यांनी आंदोलन सुरू केले, ज्यामुळे कल्याण–कर्जत भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.ते बहुजन समाज पक्षाचे (BSP) माजी राज्य महासचिव असून त्यांनी आमदार (MLA) व खासदार (MP) निवडणुका देखील लढवल्या आहेत.

महाराष्ट्रात व शिक्षण क्षेत्रात त्यांचा मजबूत जनाधार आहे.ते भारतीय राज्यघटनेवर दृढ विश्वास ठेवणारे नेतृत्व आहे.डॉ. प्रशांत रमेश इंगळे हे दलित पँथर चळवळीच्या समृद्ध वारशात, त्यांचे वडील स्व. पँथर रमेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले नेतृत्व आहे. सामाजिक परिवर्तनासाठी त्यांच्या वडिलांनी सन १९७२  मध्ये माजगाव डॉक येथील व्यवस्थापक पदाचा त्याग केला होता.लहानपणापासूनच त्यांनी दलित पँथर चळवळ, लाँग मार्च आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन प्रत्यक्ष अनुभवले आहे.तसेच त्यांना त्यांचे काका एस.एल. इंगळे गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभले असून, डीसीपी वसंत इंगळे यांनी घाटकोपर येथील रामाबाई आंबेडकर नगर येथील गोळीबार प्रकरणानंतर अन्यायाविरुद्ध भूमिका घेत ३००  PSI सह दिलेला राजीनामा हा त्यांच्या विचारांवर प्रभाव टाकणारा ठरला आहे. पुडुचेरी विधानसभा निवडणूक २०२६  साठी डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांची सह-समन्वयक म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याला जाणाऱ्या एआय एक्स्प्रेसचे प्रवासी 3 तास जास्त गरम झालेल्या फ्लाइटमध्ये अडकले

एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइटमध्ये प्रवासी वाट पाहत असलेल्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट पुणे : पुण्याला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातील अनेक प्रवासी मंगळवारी सकाळी तांत्रिक...

आयपीएल २०२६: वैभव सूर्यवंशीच्या ९३ धावांनी राजस्थान रॉयल्सच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या

राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी (एपी फोटो) नवी दिल्ली: वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेत आला कारण 15 वर्षीय खेळाडूने केवळ 38 चेंडूत शानदार 93...

डिजिटल अटक घोटाळ्यात 77 वर्षीय मुंबईतील रहिवासी 50 लाख रुपये गमावले

मुंबई: पूर्व क्षेत्र सायबर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरनुसार, डिजिटल अटक घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) अधिकारी म्हणून दाखवून सायबर घोटाळेबाजांनी घाटकोपर येथील 77...

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान 6 वर्षीय मुलाचा मृत्यू, पालकांची वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार |...

पुणे: दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल (DMH) मध्ये सोमवारी एका सहा वर्षीय मुलीचा डोळ्याच्या प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला, त्यामुळे वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप झाला. रुग्णालयाने या...

7 प्रारंभिक चिन्हे पालकांनी कधीही दुर्लक्ष करू नये आणि कशी मदत करावी

बर्नआउट हे एकेकाळी प्रौढ आणि कार्यरत व्यावसायिकांशी संबंधित होते, परंतु आता ते शाळेत जाणाऱ्या मुलांमध्येही सामान्य झाले आहे. शैक्षणिक दबाव आणि भरलेले...

error: Content is protected !!