- सर्वांच्या उपस्थितीत हरीत शपथ् घेण्यातआली
उल्हासनगर दि २७ : संपुर्ण देशभरात होळी व धुळीवंदन हे सण दिनांक २ व ३ मार्च, २०२६ रोजी मोठया उत्साहाने साजरा केला जात असतो. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या शहराचे पर्यावरण प्रदुषणमुक्त, स्वच्छ व हरीत असावे याकरीता पर्यावरणपुरक सण उत्सव साजरे करणेकरीता नागरीकांमध्ये जनजागृती करावी असे निर्देश आहेत. त्याअनुषंगाने आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे, तसेच अतिरिक्त आयुक्त, डॉ. किशोर गवस यांचे मार्गदर्शनाखाली पर्यावरण विभागातर्फे पर्यावरणपुरक होळी व धुळीवंदन प्रतिकात्मक स्वरुपात महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर महापौर, श्रीम. अश्विनी कमलेश निकम व. उपमहापौर, अमर लुंड यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. तसेच सर्वांच्या उपस्थितीत हरीत शपथ् घेण्यातआली.
पृथ्वीवरील सर्व जीवन भुमी, जल, अग्नि, वायु व आकाश या पाच नैसर्गिक घटकांवर अवलंबून आहे. परंतु सण, उत्सव उत्साहात साजरे करताना नकळत आपल्याकडून निसर्गाची हानी होते. त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरीकांना आजच्या या कार्यक्रमाद्वारे आवाहन करण्यात आले की, आपले सण, उत्सव आपण मोठया उत्साहात साजरे करताना पर्यावरणाची / निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घेऊन साजरे करावेत. पाण्याचा अपव्यय टाळावा, रासायनिक रंगांचा वापर न करता, पर्यावरणपुरक रंगांचा वापर करावा. होळी उभी करण्यासाठी मोठया प्रमाणात वृक्षतोड करू नये, पर्यावरणपुरक साहित्य वापरून लहान स्वरुपात होळी उभी करावी.

पर्यावरण विभागातर्फे आयोजित सदर कार्यक्रमाचे नियोजन उपायुक्त श्रीम. विशाखा मोटघरे, विभागपमुख श्रीम. विशाखा सावंत व पर्यावरण विभागाचे कर्मचारी यांनी केले होते. सदर कार्यक्रमास डॉ. दिपाली चौगले, उपायुक्त (मुख्यालय), अंकुश कदम, (भांडार विभागप्रमुख), राजा बुलानी (विधी विभागप्रमुख), श्रीम. छाया डांगळे, (मालमत्ता व्यवस्थापक), वृक्ष फाऊंडेशनच्या श्रीम. ज्योती तायडे व सर्व महापालिका कर्मचारी उपस्थित होते.






























