उल्हासनगर दि.२ ( प्रमोद दळवी ): उल्हासनगर शहरातील पॅनल क्रमांक १५ मधील विटीसी ग्राउंडचा मेन एंट्रीचा गेट आहे तो चाळीस वर्षांपूर्वीचा तरे चाळीकडे जाणारा रस्ता होता. पण गेल्या पाच वर्षापासून तो रस्ता नूतनीकरणाच्या कामासाठी बंद केल्याने त्यातील रहिवाशांचे हाल होत आहेत. जोपर्यंत आमच्यासाठी रस्त्याचा मार्ग खुला करून देत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही अशी भूमिका त्यातील नागरिकांनी घेतली आहे. विटीसी ग्राउंड बाहेर सर्व तरे चाळीतील नागरिकांनी निषेध करत रस्त्याची मागणी केली.

शहरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील पॅनल क्रमांक १५ मधील विटीसी ग्राउंड येथे तरे चाळी असून या चाळीत जवळपास ३०० ते ४०० घरांची वस्ती आहे. विटीसा ग्राउंडचा जो मेन एंट्री चा गेट आहे तो चाळीस वर्षांपूर्वीचा जुना रस्ता होता. तो रस्ता दीड वर्षांपूर्वी नूतनीकरणाच्या कामासाठी बंद केला होता. अद्याप पर्यंत तो रस्ता चालू केला नाही. स्थानिक नागरिकांची मागणी अशी आहे की हा रस्ता पहिले खुला करावा. जोपर्यंत रिंग रोड होत नाही तोपर्यंत मधला रस्ता गेट एन्ट्रीचा तो खोलून द्यावा जेणेकरून ॲम्बुलन्स, रिक्षा दारा पर्यंत येऊ शकते. पेशंट झाले किंवा घरातला कोणी आजारी पडला किंवा कोणी घरातला वारला तर आमच्या इथे काही सोय नाही आहे . पेशंटला आम्हाला झोळीमध्ये उचलून घेऊन जावे लागते. किंवा पेशंटला खुर्चीत बसून न्यावे लागते एवढे हाल या परिसरातील माणसांना सहन करावा लागत आहे. याशिवाय पावसाळ्यामध्ये देखील या परिसरातील नागरिकांना भरपूर त्रास आहे. पावसाळ्यामध्ये विटीसीचा रस्ता आहे तो पूर्णपणे बंद होऊन जातो.येण्या- जाण्यासाठी नागरिकांचे खूप मोठे हाल होत असतात.

या परिसरातील सर्वच नागरिकांची एकच मागणी आहे विटीसी ग्राउंडचा जो इंट्रीचा रस्ता आहे तो पूर्णपणे खोलून द्यावा आणि जे पण करणार आहेत ते लीगली लिखित स्वरूपात देण्यात यावे. कारण दोन-चार महिन्यानंतर पुन्हा रस्ता बंद करतील असे नागरिकांचे म्हणणे आहे. रिंग रोड होईपर्यंत आम्हाला या मधला गेटचा वापर करण्याची परवानगी देण्यात यावी. आम्हाला येण्या-जाण्याची सोय सध्या कुठेच नाही आहे. आमच्या रहिवाशांचा रस्ता चारी बाजूंनी पूर्ण ब्लॉक केलेला आहे. आम्हाला पूर्ण चारी बाजूने फिरून जावे लागते. आमच्याकडे पाहुणे यायचे असतील तर त्यांना एड्रेस काय द्यायचा. असा प्रश्न आम्हाला पडतो. विटीसी ग्राउंडचा मागचा गेट आहे तो खोलून तिथूनच उमेदवारांनी प्रचारासाठी आत मध्ये यावे. जोपर्यंत गेट नाही उघडणार तोपर्यंत उमेदवारांनी आत मध्ये येऊ नये आमच्या सगळ्या रहिवाशांची एवढी मागणी आहे असे विकिता वैभव तरे यांनी सांगितले. गेट उघडा करत असतील तरच प्रचाराला या अन्यथा तेव्हाच मतदान होईल.आमचा गेट उघडला नाही तर आमच्या परिसरातील एकही जण मतदानासाठी येणार नाही. अशी भूमिका येथील नागरिकांनी घेतली आहे.
याबाबत प्रमिला बाविस्कर यांनी सांगितले मी विटीसी मैदाना परिसरात तरे चाळीत राहते. आम्हा सर्व वयोवृद्धांना येणे जाण्याचा एवढा त्रास आहे. आमची लहान लहान मुले देखील शाळेत किंवा क्लासला रस्ता नसल्यामुळे जाऊ शकत नाही. याशिवाय या परिसरात मोठ्या संख्येने नशेडी, गांजाडी मुले बसलेले असतात त्यांच्यापासून आमच्या मुलांना खूप धोका आहे. या ठिकाणी राहण्यासाठी आम्हाला खूप त्रास होत आहे. असं वाटतं की घर सोडून इथून निघून जावं. या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे चाळीतील अर्धे लोक या ठिकाणाहून निघून गेले आहेत. त्यामुळे आम्हाला हा रस्ता मोकळा करून द्यावा नाहीतर आम्ही मतदान करणार नाही अशी अशी आमची भूमिका आहे असे त्यांनी सांगितले.




























