Homeशहरउल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६: ७०२ उमेदवारांनी भरले अर्ज : त्यात...

उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६: ७०२ उमेदवारांनी भरले अर्ज : त्यात २८ उमेदवारांचे अर्ज बाद

उल्हासनगर दि.०१ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उल्हासनगर शहरातील १  ते २० प्रभागांमधून जवळपास ७०२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते . उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांची  छाननी झाली असता त्यात २८ उमेदवारांचे अर्ज छाननीच्या वेळी बाद करण्यात आले आहेत. एकूण या निवडणुकीच्या रिंगणात शहरातून ६७४ उमेदवार उभे राहिले असून त्यापैकी उद्या २ जानेवारी २०२६ पर्यंत किती जण उमेदवारी अर्ज  मागे  घेणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेला आहे. त्या अनुषंगाने उल्हासनगरात  २३ डिसेंबर २०२५ ते २९ डिसेंबर २०२५ पर्यंत शहरातील ६ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून तब्बल १५०२  उमेदवारांना नामनिर्देशन पत्रांची विक्री करण्यात आली होती. तसेच नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी देखील  २३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ पर्यंत ठेवण्यात आला होता. ६ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालया पैकी निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ मध्ये-११८ , निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक २ मध्ये-७९ , निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ३ मध्ये-१०४ , निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ४ मध्ये-१२२ , निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ५ मध्ये- ११० तर , निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ६ मध्ये-१६९ असे ७०२ नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली होती. त्यापैकी अंतिमरित्या स्वीकारण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्रांची संख्या ६७४  इतकी आहे.

३१ डिसेंबरला नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली त्यावेळी २८ नामनिर्देशन पत्रे फेटाळण्यात( बाद ) करण्यात आली. त्यात निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक –  १ मधून १३ , निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक -२  मधून १ , निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक -३  मधून ३ , व निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक – ६  मधून ११  असे २८  नामनिर्देशनपत्रे फिटळण्यात ( बाद ) करण्यात आले आहेत. नामनिर्देशन पत्रामध्ये अनेक त्रुटी असल्या कारणास्तव ती बाद करण्यात आली आहेत. तसेच नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख २  जानेवारी २०२६ असून ३ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक चिन्ह उमेदवाराला देण्यात येणार आहे. त्याच दिवशी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १५ जानेवारी २०२६  रोजी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी १६ जानेवारी २०२६  रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त (निवडणूक) गणेश शिंपी यांनी दिली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

AAIB ने मार्च 2024 च्या Airprox साठी मुंबई ATC लॅप्सेसचा झेंडा दाखवला

AAIB च्या सुरक्षा शिफारशींमध्ये कंट्रोलर हँडओव्हर प्रक्रिया मजबूत करणे, प्रक्रियात्मक हवाई वाहतूक नियंत्रणामध्ये प्रशिक्षण आणि पर्यवेक्षण मजबूत करणे हे होते. मुंबई: एअर ट्रॅफिक...

प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल पुण्यात तरुण मंडळांनी आनंदोत्सव साजरा केला पुणे बातम्या

पुणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शनिवारी शहरात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. SPPU टीचर्स असोसिएशनने शनिवारी देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांवर...

‘अद्याप निवृत्त होऊ नका’: अर्जेंटिनाच्या विश्वचषकाच्या दु:खानंतर डि मारियाने लिओनेल मेस्सीला हताश विनवणी केली

न्यू यॉर्कजवळ, रविवार, १९ जुलै, २०२६ रोजी पूर्व रदरफोर्ड, एनजे येथे स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यातील विश्वचषक अंतिम सॉकर सामन्यात स्पेनकडून पराभूत झाल्यानंतर अर्जेंटिनाच्या...

टॉयलेट फ्लश बटणे: टॉयलेटमध्ये दोन फ्लश बटणे का असतात याचा कधी विचार केला आहे?...

हुशार कारण बहुतेकांना कधीच कळले नाही आधुनिक टॉयलेटमध्ये सहसा एकाऐवजी दोन फ्लश बटणे असतात. एक लहान आहे; दुसरा मोठा आहे. बहुतेक लोक त्यांना...

ग्राहक तक्रार पोर्टलवर गोपनीयतेची चिंता वाढवतात, FDA म्हणते डेटा सुरक्षित | पुणे बातम्या

तक्रार नोंदवण्यासाठी दिलेल्या त्यांच्या खाजगी तपशिलांचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती नागरिकांना वाटत आहे पुणे : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या ऑनलाइन...

error: Content is protected !!