उल्हासनगर दि. २२ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने उल्हासनगरातील विविध राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला व आपल्या पक्षाचे उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय आता उमेदवारी अर्ज भरण्यास देखील सुरुवात होणार आहे. तर कोणत्याही पक्षातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी काय जाणांचे प्रयत्नही आहेत. याशिवाय उल्हासनगर काहीजण या पक्षातून त्या पक्षात प्रवेश देखील घेताना दिसत आहेत. यावर्षी नवीन चेहरे देखील निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या प्रमाणात उतरणार आहेत. नुकताच स्वराज्य संघटनेचे सर्वेसर्वा अॅड. जय गायकवाड यांनी प्रभाग १८ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने त्यांनी टीओकेत प्रवेश केला आहे.
जय गायकवाड यांच्या प्रवेश सोहळ्या प्रसंगी ओमी कलानी, शिवसेना प्रवक्ता किरण सोनवणे, टिओकेचे पदाधिकारी संतोष पांडे, विजय मंगतानी, मनोज सचदेव, गौरव बोधवानी, मोहित पेसवानी उपस्थित होते. शहरात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने टिओके प्रमुख ओमी कलानी व साईपक्ष प्रमुख जीवन इदनानी यांच्यासोबत निवडणुकीत युती झाली आहे. त्यानुसार प्रभागनिहाय उमेदवारांची रणनीती आखण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गायकवाड यांनी टिओकेला पसंती दिली.





























