शहाड दि १७ : सेंच्युरी रेयॉन प्राथमिक शाळा, शहाड यांच्या वतीने १७ डिसेंबर २०२५ रोजी रामलीला मैदानात वार्षिक क्रीडा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एफ.एच.–एचआर श्री. श्रीकांत गोरे सर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धांतील यशाबद्दल बक्षिसे प्रदान करण्यात आली.

या प्रसंगी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. बबिता सिंग, पर्यवेक्षिका सौ. नीलम सिंग, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना भदाणे तसेच शाळा प्रशासक श्री. प्रकाश पांचाळ उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांचे कौतुक करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम, शिस्त आणि संघभावनेचे महत्त्व सांगत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांचे सहकार्य लाभले. समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला




























