उल्हासनगर दि.३० : कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाने तसेच शिवसेना उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या वतीने पूज्य चालीया साहेब पर्व समाप्ती निमित्त उल्हासनगर-१ बस स्टॉप ते चालिया साहेब मंदिर उल्हासनगर-५ बस स्टॉप पर्यंत सिंधी बांधवांसाठी आणि झुलेलाल भक्तांसाठी चालीया मंदिर येथे दर्शनाकरिता ये-जा करण्यासाठी मोफत बस सेवेचे आयोजन केले होते . या वेळी नारळ वाढवून व भगवा झेंडा दाखवून बससेवेचा शुभारंभ केला.

याप्रसंगी आमदार बालाजी किणीकर , शिवसेना उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी ,उपजिल्हा प्रमुख दिलीपजी गायकवाड,मा. नगरसेवक कालवा (बिट्टू भाई ),उपशहर प्रमुख सुरेश सोनवणे, उत्तर भारतीय प्रमुख के.डी तिवारी, युवा सेना शहराध्यक्ष बाळा श्रीखंडे,विभाग प्रमुख आदिनाथ कोरडे, समीर शेख,शाखाप्रमुख. राजू पाटील, श्राजेंद्र साळवे, गणेश शिंदे, राजन चिकणे, गणपती पानसरे तसेच इतर कार्यकर्ते सिंधी बांधव व भक्तगन मोठ्या संख्येने उपस्थित होते.






























