Homeशहरमहिलेचा फेसबुक अकाउंट हॅक करून अश्लील फोटो व व्हिडिओ पाठवणाऱ्या आरोपीला जळगाव...

महिलेचा फेसबुक अकाउंट हॅक करून अश्लील फोटो व व्हिडिओ पाठवणाऱ्या आरोपीला जळगाव येथून अटक

उल्हासनगर दि.२६ ( प्रमोद दळवी ):  उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेचा फेसबुक अकाउंट हॅक करून त्या महिलेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवणाऱ्या तरुणाला उल्हासनगर पोलिसांनी आयपी ऍड्रेस द्वारे तपास करून जळगाव येथून त्याला अटक करण्याची कामगिरी केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेचा फेसबुक अकाउंट हॅक करून एका अज्ञात आरोपीने त्या महिलेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवले होते. या घटनेमुळे ती महिला खूपच घाबरलेली होती. अखेर घाबरलेल्या त्या महिलेने तात्काळ उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना सर्व माहिती सांगितली. यासंदर्भात जुलै महिन्यात अज्ञात आरोपीविरुद्ध उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. सर्वप्रथम पोलिसांनी फेसबुक आणि जीमेल या दोघांकडून माहिती गोळा केली. त्याचबरोबर आयपी ऍड्रेसच्या माध्यमातून पोलिसांनी या घटने संदर्भात सखोल चौकशी करून जळगाव येथून जितेश या तरुणाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी या घटने संदर्भात माहिती देताना सांगितले की जुलै महिन्यात एका महिलेने उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार देत तिचा फेसबुक अकाउंट हॅक झाला आहे आणि एक अज्ञात इसमाने तिला अश्लील व्हिडिओ पाठवले आहेत याबाबत तक्रार दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात इस्मविरुद्ध गुन्हा दाखल केला होता . आमच्या पोलीस पथकांनी फेसबुक आणि जीमेल कडून माहिती मिळून आयपी ऍड्रेसच्या आधारे या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी ट्रेस करून त्याला जळगाव येथून अटक केली आहे. माझे नागरिकांना व महिलांना आव्हान  आहे की अशा प्रकारे गुन्हा आपल्या सोबत जर घडला असेल  तर आपण न घाबरता पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी येऊ शकता आपली मदत करण्यास पोलीस सदैव तयार आहेत असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहेगाव हवाई तळाजवळ कचरा टाकणाऱ्यांना पक्ष्यांच्या हल्ल्याचा धोका वाढल्याने एफआयआरला सामोरे जावे लागू शकते.

लोहेगाव येथील एअरफोर्स स्टेशनच्या परिमितीच्या भिंतीबाहेर कचरा पुणे : लोहेगाव येथील भारतीय वायुसेना (IAF) स्टेशन एअरबेसजवळ कचरा टाकताना आढळलेल्या लोकांविरुद्ध पोलिस तक्रारी दाखल...

विराट कोहली कसोटीत पुनरागमन? बालपणीच्या प्रशिक्षकाच्या ‘बघूया काय होते’ या गूढ टिप्पणीनंतर चाहते भडकले

फाइल फोटोः विराट कोफली (एपी/पीटीआय फोटो) नवी दिल्ली: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन क्रिकेट जगताला थक्क करून टाकल्यानंतर एका वर्षाहून अधिक काळ...

IIT बॉम्बे प्लेसमेंट 2024-25: कमी ऑफर, जागतिक भरती असूनही जास्त पगार

IIT बॉम्बे 2024-25 च्या प्लेसमेंट्समध्ये ऑफरमध्ये 3.5% घट झाली, तरीही सरासरी आणि सरासरी पगारात 10% वाढ झाली. मुंबई: IIT बॉम्बेचा 2024-25 साठी प्लेसमेंट...

रोबोटिक शस्त्रक्रियेने व्यावसायिकाला हिप रिप्लेसमेंटच्या दुःस्वप्नापासून वाचवले

पॉलीलिनरसह सिरेमिक रोपण पुणे: दोन वर्षांपूर्वी, जेव्हा एका 40 वर्षीय व्यावसायिकाने, आजारी लठ्ठपणाशी झुंज देत, हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली, तेव्हा त्याला "आयुष्य बदलणारी"...

भारत गौरव पर्यटक ट्रेन: भारतीय रेल्वे ने नेपाळसाठी पहिली भारत गौरव टुरिस्ट ट्रेन सुरू...

सीमापार पर्यटनाला चालना देण्यासाठी, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने प्रथमच सुरू केले आहे. भारत गौरव पर्यटक ट्रेन जे भारताला...

error: Content is protected !!