Homeशहरस्वीय सहाय्यक प्रकाश भागे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; आमदार डॉ. बालाजी किणीकर...

स्वीय सहाय्यक प्रकाश भागे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडून शुभेच्छा

अंबरनाथ दि. १९ ( प्रमोद दळवी ): शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे स्वीय सहाय्यक प्रकाश भागे यांचा वाढदिवस अंबरनाथ येथील जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच जनसंपर्क कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी प्रकाश भागे यांना केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन करत पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमादरम्यान सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी तसेच नगरसेवकांनी प्रकाश भागे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कोरेगाव-भीमा जयस्तंभ  बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी तसेच पदाधिकारी व  कार्यकर्त्यांनी प्रकाश भागे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसानिमित्त मिळालेल्या प्रेम, आपुलकी आणि शुभेच्छांबद्दल प्रकाश भागे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. “माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे हा वाढदिवस अविस्मरणीय ठरला आहे. उपस्थित राहून शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमामुळे जनसंपर्क कार्यालयात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी प्रकाश भागे यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

लिप रीडरचा दावा आहे की वर्ल्ड कप फायनलनंतर ट्रम्प यांनी स्पेन आणि अर्जेंटिनाच्या प्रत्येक...

रविवारी, 19 जुलै 2026 रोजी न्यूयॉर्कजवळील ईस्ट रदरफोर्ड, एनजे येथे स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यातील विश्वचषक अंतिम फुटबॉल सामन्याच्या शेवटी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प...

मुंबईतील तिघांची मलंगगडावरून सुटका झाली आणि ट्रेकचा प्रयत्न केल्यावर त्यांनी रिल्सवर पाहिले

कल्याण : मुंबईतील मालाड येथील तीन तरुण रविवारी रात्री उशिरा अंबरनाथमधील मलंगगडाच्या उतारावर सोशल मीडियाच्या रील्सवरून प्रेरित होऊन ट्रेक करताना अडकल्याने त्यांची...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

अमेरिकेत ‘N’ ने सुरू होणारी फक्त 8 राज्ये आहेत आणि प्रत्येक एक अद्वितीय प्रवास...

FIFA विश्वचषक 2026 नंतर युनायटेड स्टेट्समध्ये रोड ट्रिपची योजना आखणाऱ्यांसाठी, आम्हाला तुमच्यासाठी एक मनोरंजक यादी मिळाली आहे. "N" अक्षराने सुरू होणारी फक्त...

error: Content is protected !!