Homeशहरसाप्ताहिक कल्याण नागरिक तर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान

साप्ताहिक कल्याण नागरिक तर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान

उल्हासनगर शहरातील सुनिता सोनवणे यांचा कल्याणी आदर्श महिला पुरस्काराने गौरव

कल्याण दि.१२ :  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंती निमित्त साप्ताहिक कल्याण नागरिकच्या वतीने कल्याणी महिला विशेषांक प्रकाशन सोहळ्याचे रविवार दि.११ मे रोजी आयोजन करण्यात आले होते.कल्याण महिला मंडळ सभागृह,कल्याण पश्चिम येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सामाजिक,शैक्षणिक,साहित्यिक,क्रीडा, राजकीय इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा कल्याणी महिला विशेषांकात विशेष परिचय करून त्यांना सन्मानित करण्यात आले. कल्याण पूर्व विधानसभेच्या आमदार सुलभा गणपत गायकवाड,ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी उपाध्यक्षा,विद्या वेखंडे,कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे,वास्तुविशारद धनश्री भोसले आणि आकाशवाणी, मुंबई केंद्राच्या वृत्तनिवेदिका श्रद्धा वझे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त महिलांना गौरविण्यात आले.

याप्रसंगी उल्हासनगर शहरातील महिला व बालविकास विभाग, मुंबई शहर अंतर्गत कार्यरत असणाऱ्या श्रीमती सुनिता सोनवणे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात आले.उल्हासनगर शहरात वास्तव्य करणाऱ्या सुनिता सोनवणे यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षित केले.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना “कल्याणी आदर्श महिला पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी कल्याण नागरिकचे संपादक मच्छिंद्र कांबळे,व्यवसाय प्रमुख सुधिर लवांडे आणि आनंदी महिला मंच प्रमुख लता पालवे यांनी सुंदर कार्यक्रम आयोजित करून महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित केले याबद्दल पुरस्कार प्राप्त महिलांनी त्यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अफगाणिस्तान विरुद्ध भारताच्या कर्णधाराच्या शतकानंतर बॉल बॉयने शुभमन गिलच्या पायाला स्पर्श केला; व्हिडिओ व्हायरल...

नवी दिल्ली: भारताचा कर्णधार शुभमन गिलचा एक हृदयस्पर्शी क्षण मुल्लानपूरच्या न्यू पीसीए स्टेडियमवर झालेल्या एकमेव कसोटीत अफगाणिस्तानवर भारताच्या वर्चस्वपूर्ण विजयानंतर व्हायरल झाला...

मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर मुंबईतील पाण्याचा टँकर संप मागे घेतला

संपामुळे मुंबईसाठी पाण्याचा एक गंभीर पर्यायी स्त्रोत विस्कळीत झाला होता मुंबई : केंद्रीय भूजल प्राधिकरण (CGWA) कडून एनओसी न मिळाल्याने विहीर मालक आणि...

काँग्रेस, आप झुरळ जनता पक्षाच्या उद्याच्या आंदोलनापासून दूर राहणार | पुणे बातम्या

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना पुणे : गुरुवारी पुण्यात होणाऱ्या झुरळ जनता पक्षातर्फे (सीजेपी) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र...

पोमोडोरो तंत्र: ही 5-मिनिट एलोन मस्क उत्पादकता युक्ती प्रत्येक आठवड्यात तुमचे तास वाचवू शकते...

जेव्हा लोक इलॉन मस्कबद्दल बोलतात, तेव्हा ते सहसा 120-तासांच्या वर्क वीकवर आणि पूर्ण इच्छाशक्तीवर जगणाऱ्या वर्कहोलिक व्यक्तीचा विचार करतात. परंतु, याउलट, त्याच्या...

विखे पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले

पुणेमराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांना दिलेली आश्वासने पाळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत मंगळवारी कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय...

error: Content is protected !!