मुरबाड दि.२९ : यंदाच्या पाऊसाच्या सरसरी नुसार जिल्हाभरातील सर्वात जास्त पावसाचा कहर हा मुरबाड तालुक्यातबरसला आहे. २७८ मिमी, एवढी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चार दिवस पावसाचा कहर सूरू असल्याने नदिनाले दुथडी भरून वाहत असल्याने दळणवळण ते जनजीवन विस्कळित झाले आहे, कर्तव्यदक्ष तहसिलदार अभिजित देशमुख यांनी रविवारच्या सुट्टीत देखील दिवसभर म्हसा, सरळगाव, देहरी सावर्णे मेर्दी , पाटगावपठार या विभागातील ग्रामिण व दुर्गम भागात प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला.

अतिवृष्टीमुळे घर कोसळणे, लाईटच्या तारा तुटून गुरांची बळी जाणे, अशा व अनेक घटना सोबत भात शेतीच्या नुक्सानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येऊन ग्रामसेवक, तलाठी, मंडळअधिकारी ,कृषीसेवक हे जागेवर जाऊन पंचनामे करणार असल्याने शेतकरींनी देखील त्यांना सहकार्य केल्यास नुकसानभरपाई बाबत कोणी ही वंचित राहणार नाही, मागिल दोन वर्षाच्या पुरपरिस्थिती नुकसान भरपाई चे पंचनामे वेळेवर झाले नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्याचे प्रकार घडले होते, परंतु या वेळेस शेतक-यांना न्याय मिळण्याचा विश्वास निर्माण झाला आहे.
मुरबाड तालुक्यात गेल्या तीन दिवस पावसाने जोरदार हजेरी कायम ठेवल्याने दि ,२८ रविवार मुरबाड शहरात सर्वाधिक २७८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जनजीवन पुर्णत विस्कळीत झाल्याने नागरिक चाकऱ मानीना घराबाहेर पडणे कठीण झाले त्यातच रात्रभर लाईट गुल झाल्याने नवरात्रोत्सव अंधारात बुडाला दुर्गा भक्ताच्या आनंदावर पाणी फेरलं गेल ,चार दिवस संततधार बरसणारा पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने जगाचा पोशिंदा आज बांधावर बसून मदतीची याचना करीत आहे. भाताच्या लोंब्या आडव्या झाल्याने लोंब्यात भरलेला भाताचादाणां कुजण्याची शक्यता वाढली आहे, ढगाळ व थंड वातावरण त्यांत शेतात भरलेलं पाणी हे भातपिकासाठी घातक असून या लोब्यांतील दाण्याला उन्हाची गरज आहे. परंतु मुसळधार पावसामुळे भाताच्या लॉब्यांमध्ये पाणी भरल्याने शेतकरी या अस्मानी संकटात सापडला आहे.




























