Homeशहरलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये अडथळा ठरत असल्याच्या संशयातून ७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; अंबरनाथमधील...

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये अडथळा ठरत असल्याच्या संशयातून ७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; अंबरनाथमधील तरुण अटकेत

अंबरनाथ, दि. २२ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या महिलेच्या सात वर्षीय मुलाची अमानुष मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी २४ वर्षीय विकास सिंह याला अटक केली असून न्यायालयाने त्याला २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे नाव हसनैन उर्फ जाऊद्दीन कुरेशी (वय ७) असे असून तो अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लादी नाका परिसरात आईसोबत राहत होता. गेल्या तीन महिन्यांपासून विकास सिंह हा संबंधित महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हसनैन हा आपल्या संबंधांमध्ये पुढे अडथळा ठरू शकतो, अशी भावना विकासच्या मनात निर्माण झाली होती. १७ जुलै रोजी मुलाची आई घराबाहेर गेल्यानंतर विकासने घरातील लाटण्याने हसनैनच्या गुप्तांगांसह शरीराच्या विविध भागांवर क्रूरपणे मारहाण केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनीही त्याला गंभीर जखमी केले.

घटनेनंतर स्वतःवर संशय येऊ नये म्हणून विकासने जखमी मुलाला प्रथम उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात हलविले. उपचार सुरू असताना २१ जुलै रोजी हसनैनचा मृत्यू झाला.दरम्यान, सुरुवातीला विकासने अंबरनाथ पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीने मुलावर हल्ला केल्याची खोटी माहिती दिली होती. मात्र घटनाक्रमातील विसंगती आणि त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासात विकास हा मुलाच्या आईसोबत काही महिन्यांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे स्पष्ट झाले. हसनैन हा भविष्यात आपल्या संबंधांमध्ये अडथळा ठरेल, या संशयातून त्याच्यावर अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात विकास सिंह याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘मी ॲलेक्सिसला संदेश पाठवला’: मॅक ॲलिस्टरच्या वडिलांनी मेस्सीच्या ड्रेसिंग रूम पेप टॉकबद्दल मुलाने त्याला...

वर्ल्ड कप फायनलमध्ये स्पेनकडून पराभूत झाल्यानंतर अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीची प्रतिक्रिया. (एपी फोटो) अर्जेंटिनाच्या 2026 FIFA विश्वचषक फायनलपूर्वी लिओनेल मेस्सीच्या व्हायरल ड्रेसिंग-रूमच्या भाषणाभोवतीचे गूढ...

लाइव्ह लोकेशन शेअर करण्यास सांगितले, फोन पाळताखाली असू शकतात: मुंबईत तासभर ताब्यात घेतल्यानंतर विद्यार्थी

अनेक विद्यार्थ्यांनी बेकायदेशीर निरीक्षणाची भीती व्यक्त केली मुंबई : पोलिसांसोबत त्यांची थेट ठिकाणे शेअर करण्याचे निर्देश, त्यांच्यासमोर हजर राहण्यासाठी मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर पहाटे ३...

हजारे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले, प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे समर्थन केले, विद्यार्थ्यांच्या निषेधादरम्यान पोलिसांची...

अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सरकारने आंदोलकांशी संवादाद्वारे संवाद साधला पाहिजे पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा...

अनेक भारतीय घरांमध्ये रोझमेरी का मरते आणि त्याऐवजी या सुगंधित औषधी वनस्पतीच्या वाढीस मदत...

रोझमेरी पुदीना किंवा कोथिंबीर सारखी वागते असे गृहीत धरून नवशिक्या सर्वात मोठी चूक करतात. ते होत नाही.रोझमेरी खडकाळ, कोरड्या प्रदेशात विकसित झाली जिथे पावसाचे...

शिरूरमध्ये कुटुंबासह झोपलेल्या पाच वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याने ठार केले

बिबट्याने बालिकेला ठार मारलेल्या गुरांचे गोठे पुणे: शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी गावात बिबट्याच्या हल्ल्यात भाग्यश्री वारे या पाच वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याने जुन्नर वनविभागातील...

error: Content is protected !!