Homeशहरराज्य उत्पादन शुल्क विभागाची उल्हासनगरमध्ये मोठी कारवाई : १७ लाखांचा विदेशी मद्यसाठा...

राज्य उत्पादन शुल्क विभागाची उल्हासनगरमध्ये मोठी कारवाई : १७ लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त : दोघांना अटक, एक फरार

उल्हासनगर दि.७ ( प्रमोद दळवी ) : परराज्यातून महाराष्ट्रात बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणलेल्या विदेशी मद्यसाठा ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मधून राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करून त्यांच्याकडून १७ लाख १०  हजार १६० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

६ ऑक्टोबर रोजी राज्य उत्पादन शुल्क उल्हासनगर विभागाचे निरीक्षक बी.के जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विनस चौक उल्हासनगर -४  येथे सापळा रचून छापा टाकला. त्या कारवाईत २ आरोपीच्या ताब्यातून दमन निर्मित आयत विदेशी मद्याच्या १६८  बाटल्या तसेच तीन वाहने एक इंडिका कार एक रिक्षा व एक  महिंद्रा पिकप असा एकूण १७  लाख १०  हजार १६० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात सुनील बुलानी व  कटारिया या दोघांना अटक करण्यात आली असून आणखी एका अज्ञात फरार आरोपीचा शोध सुरू आहे. प्राथमिक चौकशीत हे सर्व मद्य दादरा आणि नगरहवेली व दमान येथे विक्रीसाठी असलेले पण करचुकवेगिरी  करून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेले असल्याचे समोर आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमुळे उल्हासनगर परिसरात अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहतील असे विभागाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केप वर्देने विश्वचषक इतिहास रचला, दुर्मिळ पात्रता मैलाचा दगड पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत केवळ तीन...

केप वर्देच्या खेळाडूंनी ह्यूस्टन येथे शुक्रवार, २६ जून, २०१६ रोजी विश्वचषक गट एच सॉकर सामन्यानंतर सौदी अरेबियासोबत ०-० अशी बरोबरी साधली. (एपी फोटो/डेव्हिड...

बदलाचे स्टीयरिंग व्हील: मुंबई अग्निशमन दलाला पहिली महिला चालक-ऑपरेटर मिळाली

मुंबई अग्निशमन दलाने 29 वर्षीय पल्लवी पाटील यांची पहिली महिला चालक-सह-ऑपरेटर म्हणून नियुक्ती करून इतिहास रचला आहे. मुंबई: पुढच्या वेळी सायरन वाजवून मुंबईच्या...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला फिक्स केले: पालकांनी तिच्या भावनांकडे दुर्लक्ष...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

“हे खरंच वाटलं…” तिने तिच्या लग्नात तिच्या दिवंगत वडिलांचा जुना कॅमेरा आणला; फोटोंमध्ये जे...

अशी काही अनुपस्थिती आहेत जी आपल्याला कधीही सोडत नाहीत. ते शांतपणे आयुष्यातील सर्वात मोठे टप्पे पाळतात, उत्सवाच्या क्षणांना त्या लोकांच्या आठवणींमध्ये बदलतात जे तिथे...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

error: Content is protected !!