Homeसामाजिकमहाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ व लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर,...

महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ व लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर, पुणे यांची संयुक्त संवाद सभा संपन्न..

कल्याण दि.७ : महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ व लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर, पुणे यांची संयुक्त संवाद सभा कै.भास्करराव महाजन सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व इंदाला शैक्षणिक संकुल, मुरबाड रोड, बापसई, कल्याण या ठिकाणी  संपन्न झाली.

या कार्यक्रमासाठी भव्य अशा व्यासपीठावर महासंघाचे अध्यक्ष अरुण दादा बोरोले, LCCIA अध्यक्ष डॉ सुरेंद्र पाटील, डॉ आर डी चौधरी, डॉ प्रमोद महाजन,डॉ विजय महाजन,सौ जयश्री महाजन,खान्देश सेना प्रमुख सुहास दादा बोंडे,कृष्णाजी खडसे,डॉ पवन भोळे,डॉ दिलीप नाफडे, डॉ मिलिंद पाटील,विकास वारके,डॉ निळकंठ चौधरी,डॉ.ज्ञानेश्वर पाटील,महेश बोरोले, दिव्यकांत नारखेडे,डॉ एम एन पाटील,उद्धव नारखेडे,पांडुरंग उर्फ बंडूदादा काळे,IAS ऍड शामसुंदर पाटील,डॉ सुनील भिरुड,डॉ श्री नी रा पाटील,रूपाली ठोंबरे,महेश भारंबे,सौ नीलिमा वारके,डॉ विलास खर्चे,सुनील इंगळे,निलेश बढे,मधुकर भोजू चौधरी,लोमदास लोमटे,वसंत नेहेते,नितीन जावळे,प्रल्हाद कोलते,डॉ किरण चौधरी,सौ ललिता पाटील,सौ नीता वराडे,सौ नीलिमा नेहेते,सौ नीता वायकोळे,सौ विभावरी इंगळे,सौ प्रतिभा राणे,सौ सुनंदा बोरोले,डॉ सौ सुनीता चौधरी,सीमा गाजरे, आशिष चौधरी,प्रफुल्ल बढे,नितीन सरोदे,नितीन इंगळे,भूषण गारसे, संजय झोपे,डॉ के जी भोळे,शैलेंद्र बेंडाळे,रवि पाटील प्रतिभाग्रज,डॉ संजय पाटील,हेमंत चौधरी,गेंदा पाटील,रत्नाकर चौधरी,सुरेखा कुरकुरे,पुंडलिक सरोदे,नरेंद्र पाटील, मेघश्याम बी चौधरी,डॉ धनराज बी.पाटील,राजू फालक,दिलीप कोल्हे,राजेंद्र बोरोले,दिलीप राणे आदी उपस्थित होते.यात महासंघ आणि LCCIA पदाधिकारी,सल्लागार, आमंत्रित,सत्कारार्थी,मुंबई परिसरातील वेगवेगळ्या वीस.. लेवा समाज  मंडळांचे अध्यक्ष आदींचा समावेश होता.

इंदाला ग्रुप चे सर्वेसर्वा डॉ विजय महाजन यांनी त्यांच्या कॉलेज मधील स्टाफ आणि कल्याण परिसरातील तरुण कार्यकर्त्यांच्या मदतीने इंदालाच्या सुंदर इमारती,सुंदर परिसरात सजवलेल्या सभागृहात अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन केले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या संवाद सभेसाठी समाजातील नामवंत उद्योगपती,व्यावसायिक,वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज,समाजाला वाहून घेतलेले सामाजिक कार्यकर्ते, उत्साही  समाज मंडळे पुरुष आणि महिलांचा प्रचंड सहभाग होता. सर्व उपस्थितांचे,पाहुण्याचे स्वागत महासंघाच्या आचार संहितेप्रमाणे पुष्पगुच्छ न देता शब्द सुमनांनी करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कवयित्री आई बहिणाबाई आणि समाजाचे श्रद्धास्थान सरदार पटेल यांना वंदन करून दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर समाजातील ज्ञातअज्ञात मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले यांनी भोरगाव लेवा पंचायत ही आपली मातृसंस्था असल्याचे प्रतिपादन करून,महासंघ आणि LCCIA, सर्व वर वधू सूची तयार करणारे समाज मंडळ,महिला मंडळ या समाजाच्या सर्व शीर्षस्थ  संस्था आहेत. प्रत्येकाने आपापली कामे चोख बजावून समाजाला कसा फायदा होईल याचाच विचार करण्याचे आवाहन केले.समाजातील या सर्व शिखर संस्थानी एकत्र येऊन कार्य केले तर समाजाचे ज्वलंत प्रश्न लवकर मिटतील,असे आवाहन त्यांनी केले.दुसरे प्रास्ताविक LCCIA चे डॉ आर डी चौधरी यांनी केले.त्यांनी समाजाला व्यवसायाभिमुख बनवण्याचे आपले उदिष्ट असल्याचे सांगितले.समाजाला अशा एकत्रीकरणाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.यानंतर प्रतिभाग्रज रवी पाटील यांनी लेवा समाजावरील एकत्रीकरणाचे स्वलिखित सकल लेवा गीत स्वतः सादर केले.त्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

महासंघाचे कोषाध्यक्ष डॉ मिलिंद पाटील यांनी आपल्या शीघ्र कवित्वाने सामाजिक संघटना आर्थिक सक्षम  करण्यासाठी समाजाला आवाहन केले. सामाजिक ज्वलंत प्रश्न व्यसनाधिनता, युवा व पालक प्रबोधन यावर सामाजिक कार्यकर्ते आणि महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार डॉ प्रमोद महाजन यांनी प्रबोधन केले आणि उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.त्यानंतर सकल लेवा संघटन होतच आहे पण धीम्या गतीने होत आहे यावर विवेचन करण्यासाठी  महासंघाचे सल्लागार डॉ ज्ञानेश्वर पाटील आणि महासंघाचे कार्यकारिणी सदस्य महेश बोरोले यांनी सहभाग घेतला. उपस्थितांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.महासंघाची लेवा पाटीदार समाजासाठी आदर्श विवाह आचार संहिता याचे सामूहिक वाचन आणि चर्चा पिंपळे सौदागर मंडळाचे कृष्णाजी खडसे यांनी घडवून आणली त्यानंतर त्यांच्या बरोबर  समाजबांधवांनी आचार संहितेचे पालन करण्याची शपथ घेतली.

महासंघातर्फे मुलींच्या पौगंडावस्थेतील अडचणी,जाणीव जागृती,जीवन कौशल्ये मुली आणि पालकांसाठी सुसंवाद साधत यावर प्रबोधनात्मक टिप्पणी सौ सारिका पाटील यांनी केली.महासंघातर्फे त्रैमासिक डिजिटल मॅगझिन चालवण्यात यावे यावर सौ विजया जंगले पुणे यांनी प्रकाशझोत टाकला आणि जबदारी स्वीकारली.महासंघाने त्वरित मंजुरी दिली.सिने अभिनेते निलेश बढे यांनी स्ट्रगल आणि सक्सेस यावर भाष्य केले आणि  सिनेउद्योगाकडे आपल्या  उद्योजकांनी वळण्यास सकारात्मकता स्पष्ट केली. समुपदेशिका सौ प्रतिभा राणे पुणे यांनीं विवाहपूर्व आणि विवाह पश्चात वधुवर आणि दोन्हीकडील पालकांचे समुपदेशन महत्वाचे आहे यावर भर देवून मूल,मुली,व त्यांचे पालक यांचे समुपदेशन करून घेण्याचे आवाहन केले.

सौ विभावरी इंगळे यांनी समाज प्रबोधन आणि कार्यक्रम यावर मनोगत व्यक्त केले.LCCIA तर्फे अतिशय उपयुक्त उद्बोधक अशी स्टार्टअप फॉर न्यू इंटरप्रेनर्स,बिझनेस नेटवर्किंग,ट्रस्ट बिल्डिंग अशा विषयांवर  महाचर्चा आयोजीत केली गेली…यात LCCIA चे अध्यक्ष डॉ सुरेंद्र पाटील,डॉ पवन भोळे,डॉ विजय महाजन,दिव्यकांत नारखेडे,किशोर ढाके,लिमेश महाजन,तुषार कोल्हे,पुरुषोत्तम पाचपांडे,तळेले सर,हिमांशु फालक , अमित नाफडे आदींनी सहभाग घेतला.चर्चेसोबत उपस्थितांनी  त्यात अनेक प्रश्न विचारले त्याचे योग्य निर्सन LCCIA तर्फे करण्यात आले. त्यानंतर स्कील डेव्हलपमेंट नीड ऑफ टुडेज एम्प्लॉयमेंट यावर महासंघाचे कार्यकारिणी सदस्य आणि LCCIA चे निळकंठ चौधरी, महासंघाचे उपाध्यक्ष आणि पिंपळे सौदागर मंडळाचे अध्यक्ष विकास वारके यांचा सोबत डॉ सुनील भिरुड,नितीन सरोदे,नीलिमा वारके,उमेश पाटील,प्रफुल्ल बढे,खेमचंद पाटील,निलेश सुपे,डॉ अशोक चौधरी आदी  मान्यवरांनी सहभाग घेतला.

LCCIA चे सचिव डॉ पवन भोळे आणि अध्यक्ष डॉ सुरेंद्र पाटील, अत्तरदे सर यांनी बिझीनेस नेटवर्किंग यावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर केले.इंदाला समूहाच्या चेअर पर्सन सौ जयश्री महाजन यांनी इंदाला परिवार,समाज सेवा आणि आजच्या कार्यक्रमाचे त्यांनी स्वीकारलेले प्रायोजकत्व यावर समाज बांधवांसोबत हितगुज साधले.समाजातील विशिष्ट प्राविण्य संपादन केलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी महासंघ,LCCIA आणि इंदाला परिवार तर्फे मानपत्र,ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.सत्कारार्थी COEP- VC डॉ सुनील भिरुड,साहित्यिक आणि दुर्ग पुरस्कार विजेते डॉ नी रा पाटील,उदयगिरी युद्ध नौकेवर अक्षर पताका फडकवणाऱ्या रूपाली ठोंबरे,सिने सृष्टीतील निर्माता महेश भारंबे,मायक्रो चीप आणि इतर चार पेटंट नावावर असलेल्या प्रा सौ नीलिमा वारके, PKV अकोला येथील निवृत्त संचालक प्रा डॉ विलास खर्चे,पत्रकार आणि अवयवदान आणि देहदान स्वतः लेखी संकल्प करून प्रेरणा देणारे सुनील इंगळे, नाट्य व सिने अभिनेते निलेश बढे,उद्योगपती मधुकर भोजू चौधरी,उद्योगपती चेतन लोमदास लोमटे,सामाजिक कार्यकर्ते नितीन जावळे,रतन टाटा प्रथम स्मृती दिनाबद्दल प्रथम मेडल मिळवणाऱ्या प्रा.डॉ किरण चौधरी यांचा यात समावेश होता.इंदाला परिवार तर्फे डॉ विजय महाजन यांनी चहा नाष्टा,उत्तम जेवणाची व्यवस्था,बॉटल्ड पिण्याचे पाणी अशा प्रत्येक बाबी बारकाईने पार पाडल्या.युवा कार्यकर्ते आणि पत्रकार खेमचंद पाटील यांनी कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग ची जबादारी खंड न पडू देता पार पडली.त्यानंतर कार्यक्रमाचा सारांश महासंघाचे सचिव दिलीप नाफडे यांनी सादर केला.खुमासदार शैलीत आणि प्रत्येकाचा गोड समाचार घेत महासंघाचे कार्यकारिणी सदस्य डॉ एम एन पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.कार्यक्रमाचे सुंदर काव्यात्मक आणि सभागृहाला खिळवून ठेवणारे सूत्रसंचालन सौ मनिषा बेंडाळे आणि डॉ मिलिंद पाटील यांनी केले.खान्देश विभाग उपाध्यक्ष महेंद्र पाटील सर यांच्या मदतीमुळे सूत्रसंचालक आणि व्यासपीठ यात समन्वय साधण्यात सोपे झाले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रोहित शर्माने नेटमध्ये जोरदार फटकेबाजी केल्याने शोमध्ये फ्लिक्स, पुल आणि ड्राईव्ह; अफगाणिस्तान वनडे मालिकेसाठी...

मोहालीमध्ये TimesofIndia.com: सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) कडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर, बुधवारी मोहाली येथील IS बिंद्रा पीसीए स्टेडियममध्ये भारताच्या वैकल्पिक प्रशिक्षण सत्रादरम्यान रोहित...

आरटीओला प्रथमदर्शनी ‘मानवी त्रुटी’ आढळली, कोणत्याही तांत्रिक बिघाडासाठी अनेक तपासणी करणार

सोमवारी झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत बेस्ट ओल्या भाडेतत्त्वावरील बसेसची देखभाल करण्यासाठी 125 पूर्णवेळ तंत्रज्ञ...

पुण्यातील तळेगाव एमआयडीसी युनिटमध्ये देखभालीदरम्यान CO₂ लीक झाल्याने 2 ठार, 3 जखमी

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे: तळेगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन (एमएनसी) प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी देखभालीच्या कामात...

“आईने मला मुलाखती देणे थांबवण्यास सांगितले”: प्रसिद्ध किशोरवयीन अन्वेषक सार्थक सिद्धांत त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी...

सार्थक सिद्धांत त्याच्या आईसोबत 18 वर्षीय सार्थक सिद्धांत जेव्हा राष्ट्रीय मथळे बनू लागला तेव्हा अनेकांनी एका निर्भय किशोरवयीन मुलाला शक्तिशाली व्यवस्थेला आव्हान देताना...

पुण्यापासून जगाच्या शिखरावर : एव्हरेस्ट जिंकणाऱ्या तरुण गिर्यारोहकांचे वीरांचे स्वागत | पुणे बातम्या

पुणे: जगातील सर्वोच्च शिखरावर उभे राहिल्यानंतर आठवडाभरात, पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेने 2026 च्या यशस्वी माऊंट एव्हरेस्ट मोहिमेबद्दल भव्य नागरी सत्काराचे आयोजन केल्यामुळे, चार...

रोहित शर्माने नेटमध्ये जोरदार फटकेबाजी केल्याने शोमध्ये फ्लिक्स, पुल आणि ड्राईव्ह; अफगाणिस्तान वनडे मालिकेसाठी...

मोहालीमध्ये TimesofIndia.com: सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) कडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर, बुधवारी मोहाली येथील IS बिंद्रा पीसीए स्टेडियममध्ये भारताच्या वैकल्पिक प्रशिक्षण सत्रादरम्यान रोहित...

आरटीओला प्रथमदर्शनी ‘मानवी त्रुटी’ आढळली, कोणत्याही तांत्रिक बिघाडासाठी अनेक तपासणी करणार

सोमवारी झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत बेस्ट ओल्या भाडेतत्त्वावरील बसेसची देखभाल करण्यासाठी 125 पूर्णवेळ तंत्रज्ञ...

पुण्यातील तळेगाव एमआयडीसी युनिटमध्ये देखभालीदरम्यान CO₂ लीक झाल्याने 2 ठार, 3 जखमी

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे: तळेगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन (एमएनसी) प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी देखभालीच्या कामात...

“आईने मला मुलाखती देणे थांबवण्यास सांगितले”: प्रसिद्ध किशोरवयीन अन्वेषक सार्थक सिद्धांत त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी...

सार्थक सिद्धांत त्याच्या आईसोबत 18 वर्षीय सार्थक सिद्धांत जेव्हा राष्ट्रीय मथळे बनू लागला तेव्हा अनेकांनी एका निर्भय किशोरवयीन मुलाला शक्तिशाली व्यवस्थेला आव्हान देताना...

पुण्यापासून जगाच्या शिखरावर : एव्हरेस्ट जिंकणाऱ्या तरुण गिर्यारोहकांचे वीरांचे स्वागत | पुणे बातम्या

पुणे: जगातील सर्वोच्च शिखरावर उभे राहिल्यानंतर आठवडाभरात, पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेने 2026 च्या यशस्वी माऊंट एव्हरेस्ट मोहिमेबद्दल भव्य नागरी सत्काराचे आयोजन केल्यामुळे, चार...
error: Content is protected !!