- करोना कालावधीत “अनुदान अपात्र” ठरलेल्या मराठी चित्रपटांना प्रत्येकी रुपये ५ लाखांचे विशेष अनुदान
मुंबई दि. १५ : महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. ॲड. आशिष शेलार यांनी मराठी चित्रपट निर्मात्यांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. करोना कालावधीत “अनुदान अपात्र” ठरलेल्या मराठी चित्रपटांना प्रत्येकी रुपये ५ लाखांचे विशेष अनुदान देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला असून, हे अनुदान लवकरच मुंबई येथे मा. ॲड. आशिष शेलार (सांस्कृतिक कार्य मंत्री) यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे.

मराठी चित्रपट निर्मात्यांना नवसंजीवनी मिळावी यासाठी भाजपा चित्रपट युनियन यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा सकारात्मक निर्णय शक्य झाला आहे. मा.श्री. संजयजी केणेकर (आमदार), मा.विजय सरोज (प्रभारी, भाजपा सांस्कृतिक विभाग),मा.देविदास कुलकर्णी, मा. मोहनीश जगताप, मा. राजकुमार वाघ मा . संदीप जी घुगे यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे त्यांचे आभार. प्रकट करण्यात आले आहे .
याकरीता मा. डॉ. किरण कुलकर्णी (सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग), मा. स्वाती म्हसे पाटील (व्यवस्थापकीय संचालिका, फिल्म सिटी), मा. प्रशांत साजणीकर (सहव्यवस्थापकीय संचालक, फिल्म सिटी) मा.महेशजी वाव्हळ सर, उपसचिव, सांस्कृतिक कार्य तसेच संबंधित सर्व अधिकारी यांचे तमाम मराठी चित्रपट निर्मात्यांकडून त्रिवार अभिनंदन आणि आभार प्रकट करण्यात आले आहे .मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी देणारा हा निर्णय स्वागतार्ह आहे असे बाळासाहेब गोरे ( सचिव : भाजपा चित्रपट युनियन),( अध्यक्ष : फिल्म मेकर्स ॲण्ड स्पेक्टॅकर्स असोसिएशन ),( रॉकस्टार स्टुडिओ (RSS)) यांनी सांगितले .





























