उल्हासनगर दि.२६ ( प्रमोद दळवी ) : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५० वर्षे मयत इसम बेवारस स्थितीत पडलेला पोलिसांना मिळून आला आहे. अद्याप त्या इसमाची ओळख न पडल्याने पोलीस त्या मयत इसमाच्या वारसाचा शोध घेत आहेत’
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील लाल चक्की येथील बाबा सी ग्रीन इमरान टॉवर या ठिकाणी एक अनोळखी मयत इसम बेवारस स्थितीत पडलेला असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या मयत इसमाची पाहणी केली असता तो मयत इसम अंदाजे ५० वर्षे वयोगटातील आहे. त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर ‘ओम‘ असे गोंदलेले, तसेच उजव्या हातात व उजव्या पायात काळा धागा, चेहरा गोल दाढी काळी- पांढरी, अंगात नेसूस जांभळ्या रंगाचा त्यावर उभ्या रेषा असलेला हाफ शर्ट तसेच राखाडी रंगाची जीन्स पॅन्ट व उजव्या हातावर संगीता व HR असे गोंदलेले आहे. अद्याप त्या इसमाची ओळख पटली नसून त्याचा कोणत्यातरी आजाराने मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या अनोळखी बेवारस इसमा बाबत कोणाला काय माहिती असल्यास किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याची संपर्क साधावा. असे आव्हान पोलीस उप निरीक्षक गणेश भाबड यांनी केले आहे.




























