Homeशहरमध्य रेल्वेच्या दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान रेल्वे दुर्घटना. अप अँड डाऊन मार्गावरील धावत्या...

मध्य रेल्वेच्या दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान रेल्वे दुर्घटना. अप अँड डाऊन मार्गावरील धावत्या लोकलमधून प्रवासी पडले : १० जण जखमी तर ५ जणांचा मृत्यू

ठाणे  दि ९ ( प्रमोद दळवी ) : मध्य रेल्वेच्या दिवा-  मुब्रा स्थानकादरम्यान आप अँड डाऊन मार्गावरून जाणाऱ्या धावत्या ट्रेनमधून पडून ५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून त्यात १०  प्रवासी जखमी झाले असल्याचे बोलले जात आहे. या सर्वांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार फास्ट लोकल  एकमेकांच्या शेजारून जात असतानाच हा भीषण अपघात झाला. मुब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान सीएसएमटी लोकल आणि कसारा लोकल एकमेकांना ओलांडत असताना ही घटना घडली. एक लोकल कसाऱ्याकडे तर दुसरी कसारा लोकल ही सीएसएमटीकडे जात असताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आणि जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

सीएएमटीकडून कसाऱ्याकडे जाणाऱ्या फास्ट लोकलमधून पडून या प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरी लोकल सीएसएमटीकडे जात असताना कसारा फास्ट लोकल बाजूने जात होती. त्याचवेळी काही प्रवासी हे लोकल ट्रेनमधून पडले. यामध्ये सात पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर सीएसएमटीकडे जाणारे काही प्रवासी ट्रेनमधून पडले. ट्रेनमध्ये जास्त गर्दी असल्याने हा अपघात   झाल्याचे बोलले जात आहे. रेल्वे प्रशासन आणि पोलिसानी घटनास्थळी जाऊन  जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात  उपचारासाठी पाठवण्यात आले . अपघाताची चौकशी सुरू झाली आहे. या घटनेमुळे स्थानिक सेवांवरही परिणाम झाला आहे

या दुर्घटनेबाबत रेल्वे प्रशासनाने माहिती दिली की लोकल वरती काही लोक फुटबोर्ड वरती ट्रॅव्हल करत होते. दिवा-  मुब्रा स्थानकादरम्यान दोन लोकल आजूबाजूंनी चालल्या होत्या त्याच्यावरती लोक फूटबोर्ड  वरती ट्रॅव्हल करत होते. त्यातनं आठ लोक जी आहेत ती आपापसात धक्का  लागल्यामुळे खाली पडलेले होती. या लोकांपैकी आतापर्यंतची इन्फॉर्मेशन आहे या सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल केला आहे. एका प्रवाशांनी माहिती आपल्याला दिलेली आहे ती त्या माहितीनुसार प्रवासी जे होते ते फुटबोर्ड वरती ट्रॅव्हल करत होते त्यांच्या बॅगा लागल्यामुळे किंवा बाकी गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये ते पडलेले आहेत असे रेल्वे प्रशासनाने सांगितले. नवीन सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या त्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सोबत येणार आहेत. त्याच्यामध्ये ऑलरेडीच्या २३८ एसी लोकल मुंबई सबर साठी घेतल्या जाणार आहेत. त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत. ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टम सोबत येणार आहेत. दोन्ही आपण डाउन लोकलमधील प्रवासी बाहेर लटकून जात असताना त्यांच्या बॅगा एकमेकाला लागल्यामुळे या दुर्घटना घडल्या असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची खासदार डॉ. शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून खासदार डॉ. शिंदे यांनी याप्रसंगी शोक व्यक्त केला. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस,  विधिमंडळ गटनेते डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे अपघातातील जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. मुंब्रा दुर्घटनेतील तिघांचे मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात  आहेत त्यात राहुल संतोष गुप्ता ( २८ ) रा. दिवा, सरोज केतन (२३ ) रा. उल्हासनगर आणि मयूर शाह (५० ) या तिघांचे मृतदेह आणल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे.असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणले.

जखमी व्यक्तींची माहिती खालीलप्रमाणे

1. श्री. शिवा गवळी (पुरुष २३ वर्ष/यांची प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)
2. आदेश भोईर (पु/26 वर्ष, राहणार: आढगाव, कसारा, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)
3. रिहान शेख (पु/२६ वर्ष, राहणार: भिवंडी, प्रवास: कल्याण ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
4. अनिल मोरे (पुरुष ४० वर्ष, यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)
5. तुषार भगत (पु/२२ वर्ष, प्रवास: टिटवाळा ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व  त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)
6. मनीष सरोज (पु/२६ वर्ष, पत्ता: दिवा साबेगाव, दिवा यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
7. मच्छिंद्र गोतारणे (पु/३९ वर्ष, राहणार: वाशिंद, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
8. स्नेहा धोंडे (स्त्री/२१वर्ष, राहणार: टिटवाळा, प्रवास: टिटवाळा ते ठाणे यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
9. प्रियंका भाटिया (स्त्री/२६ वर्ष, राहणार: शहाड, कल्याण यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)

मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती खालीलप्रमाणे
1. केतन दिलीप सरोज(पु/२३ वर्ष, राहणार: तानाजी नगर, उल्हासनगर)
2. राहुल संतोष गुप्ता
3. विकी बाबासाहेब मुख्यदल(पु/३४ वर्ष, रेल्वे पोलीस कर्मचारी)
4. अज्ञात व्यक्ती

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नीरज चोप्रा आशियाई खेळ 2026 मध्ये भाग घेणार, AFI ने पुष्टी केली | अधिक...

नीरज चोप्रा (इमेज क्रेडिट: एक्स) नवी दिल्ली: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा या वर्षाच्या अखेरीस जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेईल कारण तो...

शिया धार्मिकतेने आणि स्मरणाने मोहरममध्ये ‘पीडितांची संध्याकाळ’ चिन्हांकित करतात

मुंबई : मोहरमच्या १० व्या आशुरानंतर करबलाच्या शहीदांसाठी मिरवणूक, प्रार्थना आणि सार्वजनिक शोकचा दिवस शुक्रवारी संपला, शहरातील शेकडो शोककर्ते संध्याकाळी माझगाव येथील...

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या आई-वडिलांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

जामुन डिशेस: 6 स्वादिष्ट जामुन पदार्थ जे व्हिटॅमिन सी मिळवणे आश्चर्यकारकपणे सोपे करतात

जामुन, गडद जांभळा उन्हाळी फळ ज्याला काळा मनुका म्हणूनही ओळखले जाते, त्याला आंबा किंवा लीची क्वचितच आवडते. तरीही हे आंबट, रसाळ फळ...

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

error: Content is protected !!