Homeशहरपावसाळा सुरू होण्याआधीच उल्हासनगरातील गौतमवाडी रस्ता पाण्याखाली : नागरिक संताप

पावसाळा सुरू होण्याआधीच उल्हासनगरातील गौतमवाडी रस्ता पाण्याखाली : नागरिक संताप

उल्हासनगर दि. २४ ( प्रमोद दळवी )  : पावसाळा सुरू होण्याआधीच उल्हासनगर शहरातील कॅम्प  नंबर -३  येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेच्या मागे असलेला गौतमवाडीचा रस्ता पाण्याखाली आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

शहरातील कॅम्प नंबर -३  परिसरातील उल्हासनगर महापालिकेच्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकाच्या मागे गौतमवाडी हा परिसर आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरिकांची वस्ती असून त्या परिसरातील नाल्यांचे अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्या ठिकाणावरील काही नाल्या बुजलेल्या देखील आहेत. त्यामुळे त्या परिसरातील सांडपाणी नाल्यातून न जाता थेट रस्त्यावर उतरते. तुंबलेल्या नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर उतरत असल्यामुळे त्या रस्त्याला तलावाचे स्वरूप निर्माण होते. याशिवाय त्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी सुरू असते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातूनच वाहन चालकांना आपल्या गाड्या घेऊन जाव्या  लागतात. नालेसफाईसाठी आणि रस्त्यांच्या कामासाठी  महानगरपालिका दरवर्षी करोडो रुपये खर्च करत असते. पण गौतमवाडी परिसरातील रस्त्याची अवस्था जैसी थी वैशीच आहे. त्या परिसरात रस्त्याची दुरवस्था, याशिवाय नाल्याही तुंबलेल्या  अवस्थेत असूनही याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच स्थानिक नगरसेवकांचे देखील याकडे लक्ष नसल्यामुळे परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. वेळीच या परिसरातील नाल्यांची साफसफाई केली नाही तर पावसाळ्यात त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

India Vs बांग्लादेश: महिला T20 विश्वचषक: शफाली वर्माने उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी बांगलादेशला...

शफाली वर्मा (फोटो क्रेडिट: बीसीसीआय) नवी दिल्ली: ओल्ड ट्रॅफर्ड येथे गुरुवारी बांगलादेशवर पाच गडी राखून विजय मिळवून भारताने महिला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील...

मुंबई उच्च न्यायालयाने पालघरमधील वाढवण बंदर प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी खारफुटी साफ करण्यास परवानगी दिली...

आगामी बंदराला NH-48 ला जोडणारा आठ-लेन प्रवेश-नियंत्रित महामार्ग बांधण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला 208 खारफुटीची झाडे तोडण्याची परवानगी दिली. मुंबई...

‘त्याला सांगितले की मला लग्न करायचे नाही’: सिया गोयलचा दावा केतन अग्रवालने सगाई संपवण्यास...

तपासात असे दिसून आले आहे की गोयल (आर) यांनी ही योजना आखली होती, चौधरी (एल) यांनी कथितरित्या केतन (एम) यांना मारण्यासाठी घातक पुश...

10 लहान मुलींची नावे जी वेगवेगळ्या भाषांमध्ये नूतनीकरण आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहेत

या नावांना खास बनवणारी गोष्ट म्हणजे ती संस्कृती आणि भाषांच्या पलीकडे असलेली वैश्विक मूल्ये बाळगतात. ते आशा, पहाट, जीवन किंवा पुनर्जन्म यांचे प्रतीक असले...

‘हॅपी बर्थडे’ स्क्रीन, केक आणि नाईट क्लब सेलिब्रेशन: केतन अग्रवाल मृत्यूच्या चौकशीदरम्यान सिया गोयलचा...

तिचा मंगेतर केतन अग्रवालच्या मृत्यूच्या तपासादरम्यान खुनाची आरोपी सिया गोयल तिचा वाढदिवस एका नाईट क्लबमध्ये साजरा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे (एआयसह वर्धित)...

error: Content is protected !!