Homeशहरपर्यावरण दिनानिमित्त उल्हासनगर महापालिकेच्या वतीने "वृक्षारोपण व वृक्ष दिंडी" काढून नागरिकांमध्ये जनजागृती

पर्यावरण दिनानिमित्त उल्हासनगर महापालिकेच्या वतीने “वृक्षारोपण व वृक्ष दिंडी” काढून नागरिकांमध्ये जनजागृती

  • “वृक्ष दिंडी” काडून शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपन

 उल्हासनगर दि. ५ : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक ०५ जून २०२५ पासून सन २०२५ करिता राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम राबविण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याअनुषंगाने पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण व हरित उल्हासनगरच्या दिशेने वाटचाल करण्याच्या उद्देशाने, नागरिकांमध्ये पर्यावरणीय जाणीव निर्माण करणे, वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करणे व शहरामध्ये हरित क्षेत्रात वाढ घडवून आणणे या हेतूने उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने एक विशेष “वृक्षारोपण व वृक्ष दिंडी” कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ०५ जून २०२५ रोजी महापालिका मुख्यालयात मा. प्रशासक तथा आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे भा.प्र.से. यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला अजय साबळे, सहा. आयुक्त (पर्यावरण/जनसंपर्क), उल्हासनगर महानगरपालिका यांनी सर्व उपस्थित मान्यवर, अधिकारी / कर्मचारी, शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे स्वागत केले व पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व, पाण्याची बचत, प्रत्येक नागरिकाने झाडे लावावी, प्लास्टिकचा वापर टाळावा आणि पर्यावरण पूरक जीवनशैली अंगीकारावी. तसेच वाहन विभागाने जास्तीत-जास्त इलेक्ट्रीक वाहने चालविण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले व “नील पर्ल फाऊन्डेशन व आस्था बहुउद्देशीय संस्था, उल्हासनगर-४  यांनी सदर कार्यक्रमात वृक्षरोपे पुरवून सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार व स्वागत करण्यात आले. पर्यावरण विभाग प्रमुख. दत्तात्रय जाधव यांनी सर्व उपस्थितांसह “हरित शपथ घेतली.

त्यानंतर उल्हासनगरचे मा. आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून, महापालिकेच्या मुख्य प्रांगणात वृक्षारोपण करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले, पर्यावरणाचे संरक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून, प्रत्येक नागरिकाने झाडे लावून त्यांचे संवर्धन करणेचा संदेश मा. आमदारांनी शहरवासीयांना दिला.त्यानंतर “वृक्ष दिंडी” उल्हासनगर महापालिका मुख्यालयातून ७०५ गार्डन, गोलमैदान, ४४४ गार्डन (नाना-नानी पार्क समोर), सपना गार्डन व परत महापालिका मुख्यालय अश्या मार्गाने काढण्यात आली व शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपन करण्यात आले.

सदर कार्यक्रमास उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, महापालिका अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उप-आयुक्त श्रीम. दिपाली चौगले, उप-आयुक्त डॉ. विजय खेडकर, सहा. आयुक्त (पर्यावरण / जनसंपर्क) अजय साबळे, पर्यावरण विभाग प्रमुख दत्तात्रेय जाधव, मुख्य बाजार निरीक्षक. विनोद केणे, विधी विभाग प्रमुख राजा बुलानी, मालमत्ता व्यवस्थापक श्रीम. विशाखा सावंत, माजी महापालिका सदस्य राजेश वधरिया, उल्हासनगर भाजपा अध्यक्ष. महेश सुखरामानी तसेच महापालिकेतील इतर अधिकारी / कर्मचारी व शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केप वर्देने विश्वचषक इतिहास रचला, दुर्मिळ पात्रता मैलाचा दगड पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत केवळ तीन...

केप वर्देच्या खेळाडूंनी ह्यूस्टन येथे शुक्रवार, २६ जून, २०१६ रोजी विश्वचषक गट एच सॉकर सामन्यानंतर सौदी अरेबियासोबत ०-० अशी बरोबरी साधली. (एपी फोटो/डेव्हिड...

बदलाचे स्टीयरिंग व्हील: मुंबई अग्निशमन दलाला पहिली महिला चालक-ऑपरेटर मिळाली

मुंबई अग्निशमन दलाने 29 वर्षीय पल्लवी पाटील यांची पहिली महिला चालक-सह-ऑपरेटर म्हणून नियुक्ती करून इतिहास रचला आहे. मुंबई: पुढच्या वेळी सायरन वाजवून मुंबईच्या...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला फिक्स केले: पालकांनी तिच्या भावनांकडे दुर्लक्ष...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

“हे खरंच वाटलं…” तिने तिच्या लग्नात तिच्या दिवंगत वडिलांचा जुना कॅमेरा आणला; फोटोंमध्ये जे...

अशी काही अनुपस्थिती आहेत जी आपल्याला कधीही सोडत नाहीत. ते शांतपणे आयुष्यातील सर्वात मोठे टप्पे पाळतात, उत्सवाच्या क्षणांना त्या लोकांच्या आठवणींमध्ये बदलतात जे तिथे...

error: Content is protected !!