Homeशहरनिविदा प्रक्रियेत बाद ठरलेला कंपनीलाच नालेसफाईचा ठेका : उल्हासनगर महानगरपालिकेचा अजब कारभार.

निविदा प्रक्रियेत बाद ठरलेला कंपनीलाच नालेसफाईचा ठेका : उल्हासनगर महानगरपालिकेचा अजब कारभार.

उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिकेने शहरात पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई करण्यासाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेत जवळपास चार कंपन्यांनी आपल्या निविदा भरल्या होत्या. पण निविदा मधील अटी शर्यतीत सर्वच कंपन्या बाद झाल्या असताना पालिकेने बाद झालेल्या एका कंपनीला शहरातील नालेसफाईचा ठेका दिल्याने उल्हासनगर महापालिका प्रशासनाच्या या अजब कारभाराबाबत शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाईसाठी पालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली होती. या निविदा प्रक्रियेत जवळपास चार कंपनींनी निविदा भरल्या होत्या. पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये निविदा प्रक्रिया पार पडली. निविदा प्रक्रियेत ज्या अटी शर्यती होत्या त्यात चारही कंपन्या पूर्ण करू शकले नाही आणि त्यामुळे चारी कंपन्या या निविदा प्रक्रियेतून बाद झाल्या. मात्र याच निविदा प्रक्रियेतून बाद झालेल्या शुभम कन्स्ट्रक्शन या कंपनीला शहरातील नालेसफाईचा तब्बल एक कोटी ६९ लाखांचा ठेका देण्यात आला. पालिकेच्या या अजब कारभाराबाबत आक्षेप उपस्थित केले जात आहे. जर ही कंपनी बाद ठरली आहे तर तिच्यावर उल्हासनगर महापालिका इतकी मेहरबान का झाली? या कंपनीला हे काम दिल जातंय दुसऱ्या कंपन्यांना हे काम का दिल जात नाही. जर निविदा प्रक्रियेतून बाद झालेल्या कंपनीला काम द्यायचं होतं तर.निविदा प्रक्रिया राबवली गेली ती फक्त देखावा करण्यासाठी का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. उल्हासनगर महानगरपालिकेतील काही अधिकारी व सत्ताधारी यांच्या मर्जीतील ही कंपनी व ठेकेदार असल्याने त्यामुळेच हे काम दिले गेले असल्याचे बोलले जात आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी ही निविदा प्रक्रिया पार पडली पण अजूनही नालेसफाईचा काम सुरू झालं नाही शिवाय पाऊस आल्यानंतर जे नाले आहेत ज्याच्यात  कचरा भरलेला आहे ती घाण वाहून जाईल आणि या ठेकेदाराला तसेच पैसे मिळतील का असा देखील सवाल उल्हासनगरातील नारारिक उपस्थित करत आहेत.

याबाबत महानगरपालिकेचे सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले उल्हासनगरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याच्या उद्देशाने जी निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. त्या निविदा प्रक्रियेत सर्वच कंपन्या बाद ठरल्या. पावसाळा तोंडावर आल्याने आणि महानगरपालिकेकडे वेळ नसल्यामुळे शहरातील पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणे गरजेचे होतं. त्यामुळे पूर्वीच्या ठेकेदाराला नालेसफाईचा ठेका देण्यात आल्या आहे असे मनीष हिवरे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर शहराच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समवेत...

उल्हासनगर दि १७ ( प्रमोद दळवी ): महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समवेत मुंबई येथील नंदनवन येथे माजी आमदार...

IPL 2026: वैभव सूर्यवंशी स्क्रिप्ट इतिहास, सर्वाधिक सह भारतीय बनला…

राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी (एपी फोटो/मनीष स्वरूप)" decoding="async" fetchpriority="high"/>राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी (एपी फोटो/मनीष स्वरूप) रविवारी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान...

मुंबईचे दादर रेल्वे स्थानक सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करते

दादर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिग्नलिंग सिस्टम मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, दादर रेल्वे स्थानकाने रविवारी वितरित आर्किटेक्चरसह...

महसुली सुनावणी सुलभ करण्यासाठी, अर्ध-न्यायिक प्रकरणांमध्ये होणारा विलंब रोखण्यासाठी महाने SOP जारी केले

पुणेमहाराष्ट्र सरकारने शुक्रवारी महसूल विभागाच्या सुनावणीसाठी सर्वसमावेशक मानक कार्यप्रणाली (SOP) जारी केली, ज्याचा उद्देश अर्ध-न्यायिक कार्यवाही सुव्यवस्थित करणे आणि प्रकरणे वेळेत निकाली...

जूनच्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी दिल्लीपासून 500 किमीच्या आत 5 वीकेंड गेटवे

"टेकड्यांची राणी" म्हणून ओळखले जाणारे, मसुरी हे दिल्लीतील सर्वात लोकप्रिय वीकेंड गेटवेपैकी एक आहे - आणि चांगल्या कारणास्तव. हिमालयाने वेढलेले, हिल स्टेशन थंड हवामान,...

error: Content is protected !!