Homeशहर" धम्मपद – एक धम्मदेसना" कार्यक्रमात अनेक मान्यवरांचा भीमरत्न पुरस्काराने सन्मान

” धम्मपद – एक धम्मदेसना” कार्यक्रमात अनेक मान्यवरांचा भीमरत्न पुरस्काराने सन्मान

उल्हासनगर दि .१३ :महापुरुषांच्या संयुक्त जयंती व वैशाख बौद्ध पौर्णिमा निमित्त स्वराज्य संघटनेच्या वतीने “धम्मपद – एक धम्मदेसना” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उल्हासनगरातील कॅम्प  नं – ४  परिसरातील सिद्धार्थ स्नेहमंडळ मैदान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष टेकडी येथे आयोजन करण्यात आले होते.हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या साक्षीने हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भव्यतेत पार पडला.

कार्यक्रमात आयुष्यभर बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करणारे भंते डॉ. एन. आनंद महाथेरो यांना “शक्यमुनी पीस अवॉर्ड” देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात पहलगाम येथील हल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आणि  शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच, भारतातील पहिली डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकॅडमी आणि रिसर्च सेंटर तळोजा येथे सुरू करणारे आणि तिथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्वखर्चाने बसवणार असल्याची घोषणा करणारे सन्मा. ॲड. गजानन चव्हाण (सदस्य, महाराष्ट्र व गोवा वकील परिषद) यांना भीमरत्न पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात उल्लेखनीय सामाजिक योगदानाबद्दल सन्मा. कल्याणजी घेटे (सहाय्यक पोलिस आयुक्त, कल्याण), सन्मा. शैलेश काळे (सहाय्यक पोलिस आयुक्त, अंबरनाथ),सन्मा. सुखदेव पाटील (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग),सन्मा. लताताई पडघाण (बौद्ध धम्म प्रचारक) या मान्यवरांना भीमरत्न पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात आले.

स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी कार्यक्रमात “जात नहीं धर्म पूछा” या विषयावर भाष्य करत बुद्धाचे पंचशील व अष्टांग मार्ग सर्व धर्मीयांनी आत्मसात करण्याचे आवाहन केले. “जो माणूस पंचशील आणि अष्टांग मार्ग पाळतो, तो कधीच हिंसा करत नाही.” असे ते म्हणाले,

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वराज्य संघटनेचे ॲड. सचिन खंडागळे, ॲड. राहुल बनकर, शशी सावंत, मयूर पगारे, राहुल आढाव, अरुण काकळीस, ॲड. सुधीर पंडित, ॲड रुपेश उबाळे, किरण फिस्के, तुषार मिरपगार, रावसाहेब सदाफुले, छगन पवार, सुमेध तांबे, सुशील सोनवणे, ॲड. सन्नी लबाना, विकास बोराडे आणि अनेक कार्यकर्त्यांनी , हितचिंतकांनी अतिशय मेहनत घेतली आणि हजारोंच्या संख्येने आलेल्या नागरिकांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वैशाख बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रम “धम्मपद एक धम्मदेसना” हजारो नागरिकांच्या उपस्थित पार पडला. कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानले आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर महानगरपालिकेचे मा. सचिव प्रकाश कुकरेजा यांना वाढदिवसानिमित्त राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी दिल्या शुभेच्छा

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी )  : प्रजा कृपा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उल्हासनगर महानगरपालिकेचे मा. सचिव प्रकाश कुकरेजा यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहरप्रमुख...

मध्यवर्ती रुग्णालयात पहिली एंडोस्कोपिक सेप्टोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी : उल्हासनगरच्या आरोग्यसेवेत अत्याधुनिक सुविधेची भर

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील वैद्यकीय सेवांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा आणि अभिमानास्पद टप्पा गाठण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय...

‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत उल्हासनगरमध्ये भव्य बाईक रॅली : राष्ट्रभावनेचा जागर

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी ) : ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत नागरिकांमध्ये राष्ट्रभावना निर्माण व्हावी, देशप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी तसेच राष्ट्रीय ध्वजाबद्दल...

एक हात मदतीचा सामाजिक संस्थेच्या मागणीला यश ; महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लवकरच गणवेश व...

उल्हासनगर दि.१३ ( प्रमोद दळवी )  : शाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना उलटूनही उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश व आवश्यक शैक्षणिक साहित्य...

अंबरनाथमध्ये गाळ्याच्या वादातून भाजप-मनसे कार्यकर्ते भिडले; पोलीस ठाण्याच्या आवारात वाहनाची तोडफोड,मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के...

अंबरनाथ दि. १२ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजीनगर परिसरात गाळ्याच्या जुन्या वादातून भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद होऊन हाणामारी झाल्याची...

error: Content is protected !!