Homeशहरठाणे जिल्ह्यात खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा ‘शिवसंवाद दौरा’: शहापूर,...

ठाणे जिल्ह्यात खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा ‘शिवसंवाद दौरा’: शहापूर, मुरबाडसह सहा विधानसभांमध्ये घेणार आढावा बैठका

कल्याण दि. २३ :  – आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राज्यव्यापी “शिवसंवाद दौरा” अंतर्गत रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी ठाणे जिल्ह्यातील ६ विधानसभांमध्ये आढावा बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या दौऱ्यात राज्यमंत्री योगेश कदम, खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी उपस्थित राहणार आहेत.

नाशिक जिल्ह्यातील ‘शिवसंवाद दौऱ्या’चा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात ठाणे जिल्हात विधानसभा निहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे.  या दौऱ्यादरम्यान आगामी निवडणुकांची तयारी, बूथस्तरावरील पक्षबांधणी, संघटनात्मक रणनीती तसेच शिवसेनेच्या विविध आघाड्या आणि विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. विशेषतः एसआयआर मोहिमेअंतर्गत बीएलए आणि बूथ प्रमुखांच्या नियुक्त्यांबाबतही सविस्तर चर्चा होणार आहे. जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांशी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे थेट संवाद साधणार असून संघटनबांधणी अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

या बैठकींमध्ये जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच बूथस्तरावरील शिवसैनिकांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे. संघटनात्मक अडचणी, स्थानिक प्रश्न, निवडणुकांतील आव्हाने आणि पुढील नियोजन यावर सविस्तर चर्चा होणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढवणे, प्रत्येक बूथवर पक्षाची पकड मजबूत करणे आणि तळागाळातील शिवसैनिकांना नव्या उमेदीने सक्रिय करणे, हा या दौऱ्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.

असा असेल ठाणे जिल्ह्यातील ‘शिवसंवाद दौरा’

शिवसंवाद दौऱ्याची सुरुवात सकाळी १० वाजता शहापूर आणि मुरबाड विधानसभा आढावा बैठकीने होणार असून ही बैठक गोरक्षनाथ मठ, चेरवली, किनवली येथे आयोजित करण्यात आली आहे. तर दुपारी १ वाजता अंबरनाथ आणि उल्हासनगर विधानसभा मतदारसंघांची आढावा बैठक रॉयल गार्डन हॉल, कांबा, कल्याण-मुरबाड रोड, कल्याण ग्रामीण येथे पार पडणार आहे. दुपारी ४ वाजता भिवंडी ग्रामीण आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघांची आढावा बैठक आमंत्रण बँक्वेट हॉल, रांजनोली, भिवंडी येथे पार पडणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

India Vs बांग्लादेश: महिला T20 विश्वचषक: शफाली वर्माने उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी बांगलादेशला...

शफाली वर्मा (फोटो क्रेडिट: बीसीसीआय) नवी दिल्ली: ओल्ड ट्रॅफर्ड येथे गुरुवारी बांगलादेशवर पाच गडी राखून विजय मिळवून भारताने महिला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील...

मुंबई उच्च न्यायालयाने पालघरमधील वाढवण बंदर प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी खारफुटी साफ करण्यास परवानगी दिली...

आगामी बंदराला NH-48 ला जोडणारा आठ-लेन प्रवेश-नियंत्रित महामार्ग बांधण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला 208 खारफुटीची झाडे तोडण्याची परवानगी दिली. मुंबई...

‘त्याला सांगितले की मला लग्न करायचे नाही’: सिया गोयलचा दावा केतन अग्रवालने सगाई संपवण्यास...

तपासात असे दिसून आले आहे की गोयल (आर) यांनी ही योजना आखली होती, चौधरी (एल) यांनी कथितरित्या केतन (एम) यांना मारण्यासाठी घातक पुश...

10 लहान मुलींची नावे जी वेगवेगळ्या भाषांमध्ये नूतनीकरण आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहेत

या नावांना खास बनवणारी गोष्ट म्हणजे ती संस्कृती आणि भाषांच्या पलीकडे असलेली वैश्विक मूल्ये बाळगतात. ते आशा, पहाट, जीवन किंवा पुनर्जन्म यांचे प्रतीक असले...

‘हॅपी बर्थडे’ स्क्रीन, केक आणि नाईट क्लब सेलिब्रेशन: केतन अग्रवाल मृत्यूच्या चौकशीदरम्यान सिया गोयलचा...

तिचा मंगेतर केतन अग्रवालच्या मृत्यूच्या तपासादरम्यान खुनाची आरोपी सिया गोयल तिचा वाढदिवस एका नाईट क्लबमध्ये साजरा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे (एआयसह वर्धित)...

error: Content is protected !!