उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी ): ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील परिमंडळ -४ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील सहा महिन्यापासून विठ्ठलवाडी, शिवाजीनगर, बदलापूर पूर्व, पश्चिम तसेच अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या परिसरात घरफोडी व दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या चोरीच्या घटनेचा उलगडा करण्यासाठी गुन्हे शाखा घटक- ४चे पोलीस पथक तपास करीत असताना दोन सराईत गुन्हेगारांना त्यांनी अटक केली आहे. चौकशीत या दोन्ही आरोपींकडून १० गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून सुमारे दोन लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिमंडळ -४ परिसरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने घडत असलेल्या-४ चे पोलीस करीत होते. त्यावेळी पोलीस हवालदार गणेश गावडे,राजेंद्र थोरवे आणि मंगेश जाधव यांनी काही ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेत असताना घरपोडी व वाहन चोरीच्या घटनेत लकीसिंग गब्बरसिंग टाक व कृष्णा शंकर शर्मा यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय काजारी. श्रीरंग गोसावी, अशोक पवार, पोलिस हवालदार प्रकाश पाटील, गणेश गावडे,राजेंद्र थोरवे,रितेश वंजारी, मंगेश जाधव, शेखर भावेकर, सतिश सपकाळे, अमर कदम तसेच पोलीस शिपाई अशोक थोरवे, प्रसाद तोंडलीकर, रामदास उगले नितीन बैसाणे आणि अविनाश पवार यांच्या पोलीस पथकाने सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली.
तपासादरम्यान आरोपींनी विठ्ठलवाडी, शिवाजीनगर ,बदलापूर पूर्व, पश्चिम तसेच अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व दुचाकी चोरीचे एकूण १० गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यांमध्ये घरफोडी करून रोख रक्कम मौल्यवान वस्तू चोरी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान अटक आरोपी लकीसिंग टाका घोरपडी प्रकरणातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी नागपूर, वर्धा, छत्रपती संभाजी नगर तसेच कर्नाटक राज्यात मिळून एकूण ९ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण १० गुन्हे उघडकीस आणून जवळपास दोन लाख १४ हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केली आहे. अधिक तपास उल्हासनगर गुन्हे शाखा घटक – ४ चे पोलीस करीत आहेत.





























