Homeशहरखासदारांच्या मतदार संघातील उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांचे हाल : व्हेंटिलेटर...

खासदारांच्या मतदार संघातील उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांचे हाल : व्हेंटिलेटर न मिळाल्याने ७ महिन्याच्या बाळाचा मृत्यू

  • रुग्णालयात परिपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्याची भाजपा नगरसेविकेची मागणी

उल्हासनगर दि ३ ( प्रमोद दळवी ) : ठाणे जिल्ह्यातील गोरगरीब सामान्य नागरिकांना चांगल्या  दर्जाचे उपचार तेही निशुल्क  रुग्णालयात शासनाने उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे आता गोरगरीब  रुग्णांचे हाल होणार नाहीत असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत असले तरी त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातील उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात ( सेंट्रल हॉस्पिटल ) मध्ये अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. नुकताच जन्माला आलेला ७ महिन्याच्या लहान बाळाला त्या रुग्णालयात व्हेंटिलेटर न मिळाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने त्या  रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णांना परिपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सुचित्रा सिंग यांनी मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मनोहर बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नुकताच उल्हासनगरातील मध्यवर्ती मध्यवर्ती रुग्णालयामध्ये एका महिलेची प्रसूती होऊन तिने ७ महिन्याच्या बालकाला जन्म दिला होता. ते बाळ मुदतपूर्वी जन्माला आल्याने त्याची प्रकृती खूपच नाजूक होती. त्याला व्हेंटिलेटरची गरज होती. पण मध्यवर्ती हॉस्पिटलमध्ये त्याला व्हेंटिलेटर न मिळाल्याने त्या बालकाचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमधील अपुऱ्या सुविधांमुळे त्या बालकाला आपला जीव गमवावा लागला. हॉस्पिटलच्या या हलगर्जीपणामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे . अशा प्रकारची घटना पुन्हा या हॉस्पिटलमध्ये घडू नये म्हणून उल्हासनगर शहरातील पॅनल क्रमांक ७ च्या भाजपच्या नगरसेविका सुचित्रा सिंग यांनी रुग्णालयात जाऊन मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बनसोडे यांची भेट घेऊन त्यांना या घटनेबाबत जाब विचारण्यात आला.

हे मध्यवर्ती रुग्णालय सेंट्रल गव्हर्नमेंटचे  हॉस्पिटल असून या हॉस्पिटलमध्ये खेड्यापाड्यातून तसेच शहरी भागातून देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात. पण हॉस्पिटल मधील असविधानच्या कारणामुळे रुग्णाचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात. या हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने गरीब लोकच येत असतात. त्यामुळे त्यांना वेळेत चांगले उपचार मिळणे गरजेचे आहे. पण या हॉस्पिटलमध्ये साधं व्हेंटिलेटर ही नसल्यामुळे आज पर्यंत कित्येक जणांचा मृत्यू झाला असावा असाही आरोप नगरसेविका सुचित्रा सिंग यांनी करत डॉक्टर बनसोडे यांना जाब विचारला.

मध्यवर्ती रुग्णालयात व्हेंटिलेटरची आवश्यकता असून ते त्वरित मागवण्यात यावे. ज्या ज्या सुविधा अपुरे आहेत त्याची देखील पूर्तता करावी. शासनाकडे त्याची मागणी करावी. जेणेकरून गरीब जनतेला या रुग्णालयात चांगले उपचार मिळतील असेही नगरसेविका सुचित्रा यांनी सांगितले. रुग्णालयात स्टाफची खूप कमतरता आहे. २००६ ला जो स्टाफ होता आज २० वर्षे झाली तरी तोच स्टाफ आहे. आतापर्यंत या रुग्णालयात कोणतीच भरती झाली नाही. दिवसान दिवस रुग्णांची संख्या वाढत आहे पण. रुग्णालयातील डॉक्टर व स्टाफ यांचे संख्याबळ मात्र वाढत नाही असेही नगरसेविका सुचित्रा यांनी सांगितले. हॉस्पिटलमध्ये त्वरित स्टाफची संख्याबळ वाढवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करा अशी मागणी त्यांनी  डॉ. मनोहर बनसोडे यांच्याकडे केली. मध्यवर्ती रुग्णालय हे सर्वात मोठे रुग्णालय आहे त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांसाठी उपयुक्त असणाऱ्या सगळ्या सुख सुविधा असाव्या असेही त्यांनी  बनसोडे यांना सांगितले. व्हेंटिलेटर आणि एन आय सी यु देखील या रुग्णालयात नसल्याचे सांगण्यात आले आहे.

मुद्दतपूर्वी जन्माला आलेल्या बालकाला व्हेंटिलेटर मिळाला नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मध्यवर्ती रुग्णालयात घडल्याने मध्यवर्ती रुग्णालयाचा किती हलगर्जीपणा आहे हे दिसून आला आहे. या घटनेमुळे उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली असून उल्हासनगरतील मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णांसाठी उपयुक्त असणाऱ्या सगळ्या सुविधा त्या हॉस्पिटलमध्ये असाव्या अशी मागणी सर्वत्र केली जात आहे. दुसरीकडे स्थानिक आमदार आणि खासदार आणि या रुग्णालयाकडे लक्ष केंद्रित करून गोरगरीब नागरिकांना या रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी रुग्णांमधून केली जात आहे

या बाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी सांगितले गेल्या २०  वर्षांमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्या लोकसंख्या प्रमाणे आता ४०० बेडचे हॉस्पिटल करण्याकरिता शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे. त्याची मंजुरी झाल्यानंतर त्यानुसार रुग्णालयाला स्टाफ आपल्याला मंजूर होईल. आणि जी डॉक्टरांची आता कमतरता आहे ती कमतरता भरून काढण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहेत असे ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रोहित शर्माने नेटमध्ये जोरदार फटकेबाजी केल्याने शोमध्ये फ्लिक्स, पुल आणि ड्राईव्ह; अफगाणिस्तान वनडे मालिकेसाठी...

मोहालीमध्ये TimesofIndia.com: सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) कडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर, बुधवारी मोहाली येथील IS बिंद्रा पीसीए स्टेडियममध्ये भारताच्या वैकल्पिक प्रशिक्षण सत्रादरम्यान रोहित...

आरटीओला प्रथमदर्शनी ‘मानवी त्रुटी’ आढळली, कोणत्याही तांत्रिक बिघाडासाठी अनेक तपासणी करणार

सोमवारी झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत बेस्ट ओल्या भाडेतत्त्वावरील बसेसची देखभाल करण्यासाठी 125 पूर्णवेळ तंत्रज्ञ...

पुण्यातील तळेगाव एमआयडीसी युनिटमध्ये देखभालीदरम्यान CO₂ लीक झाल्याने 2 ठार, 3 जखमी

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे: तळेगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन (एमएनसी) प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी देखभालीच्या कामात...

“आईने मला मुलाखती देणे थांबवण्यास सांगितले”: प्रसिद्ध किशोरवयीन अन्वेषक सार्थक सिद्धांत त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी...

सार्थक सिद्धांत त्याच्या आईसोबत 18 वर्षीय सार्थक सिद्धांत जेव्हा राष्ट्रीय मथळे बनू लागला तेव्हा अनेकांनी एका निर्भय किशोरवयीन मुलाला शक्तिशाली व्यवस्थेला आव्हान देताना...

पुण्यापासून जगाच्या शिखरावर : एव्हरेस्ट जिंकणाऱ्या तरुण गिर्यारोहकांचे वीरांचे स्वागत | पुणे बातम्या

पुणे: जगातील सर्वोच्च शिखरावर उभे राहिल्यानंतर आठवडाभरात, पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेने 2026 च्या यशस्वी माऊंट एव्हरेस्ट मोहिमेबद्दल भव्य नागरी सत्काराचे आयोजन केल्यामुळे, चार...

error: Content is protected !!