Homeशहरऑटिझम (स्वमग्नता) असलेल्या रुग्णांसाठी 'मोफत आतड्यांच्या आरोग्याचे मूल्यांकन आणि मायक्रोबायोम चाचणी शिबिरचे...

ऑटिझम (स्वमग्नता) असलेल्या रुग्णांसाठी ‘मोफत आतड्यांच्या आरोग्याचे मूल्यांकन आणि मायक्रोबायोम चाचणी शिबिरचे आयोजन

मुंबई  दि. २३ : हैदराबादस्थित संशोधन-आधारित संस्था ‘रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशन’, डॉ. चंद्रशेखर थोडुपुनुरी यांनी स्थापन केलेले एक अग्रगण्य आरोग्यसेवा केंद्र आहे. रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशनच्या चालू असलेल्या अविरत संशोधनातून असे दिसून आले आहे की ऑटिझमची सुरुवात गर्भाशयातच होते. म्हणूनच, ऑटिझमच्या या वाढत्या घटनांना तोंड देण्यासाठी आणि अगदी गर्भाशयातूनच तो पूर्णपणे समूळ नष्ट करण्यासाठी, रिस्प्लाइसने ऑटिझमसाठी देखील एक प्रतिबंधात्मक कार्यक्रम आणला आहे.

रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशन, ‘शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’, ‘माझा ‘सु’ संकल्प अभियान’ आणि ‘करुणा सेवा ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने, ऑटिझम (स्वमग्नता) असलेल्या रुग्णांसाठी ‘मोफत आतड्यांच्या आरोग्याचे मूल्यांकन आणि मायक्रोबायोम चाचणी शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत, ‘द म्हैसूर ऑडिटोरियम’, पहिला मजला, भाऊदाजी रोड, किंग्स सर्कल समोर, माटुंगा पूर्व, मुंबई – ४०००१९ येथे पार पडेल.नोंदणीसाठी कृपया ८४३३५२९७६९ / ८४३३५२९४३५ / ९१०००६५५५२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

डॉ. चंद्रशेखर थोडुपुनुरी म्हणाले, “संशोधन केल्यानंतर आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो आहोत की, कृषी रसायनांचा जैवसंचय हा ऑटिझमच्या विकासात एक महत्त्वपूर्ण योगदान देणारा घटक असू शकतो. या निष्कर्षाला ‘एनव्हायर्नमेंटल वर्किंग ग्रुप’च्या २००५ मधील नवजात बालकांवरील ‘बॉडी बर्डन’ अभ्यासासारख्या अभ्यासांचा आणि ‘एमएएचए’  अहवालातील अलीकडील चर्चांचा आधार आहे. कृषी रसायने गर्भधारणेदरम्यान गर्भाच्या रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात आणि मेंदूच्या विकासाच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियांमध्ये संभाव्यतः व्यत्यय आणू शकतात. या संपर्कामुळे गर्भाच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये चेतासंस्थेच्या सूक्ष्म रचनेत व्यत्यय येऊ शकतो.”

डॉ. चंद्रशेखर पुढे म्हणाले, “गर्भधारणेपूर्वी कृषी-रसायनांच्या जैवसंचयावर उपाययोजना करणे, तसेच लक्ष्यित प्रसूतिपूर्व हस्तक्षेपांचा समावेश करणे, हा ऑटिझमवर एक प्रतिबंधात्मक उपाय ठरू शकतो. म्हणून भविष्यातील संशोधनाने या क्षेत्रांना प्राधान्य दिले पाहिजे. कृषी-रसायनांच्या संपर्कामुळे मुलांमधील आतड्यातील सूक्ष्मजीवांच्या सुरुवातीच्या विकासावरही परिणाम होऊ शकतो. हा व्यत्यय कोलायटिस, क्रोहन रोग आणि आतड्यांच्या इतर जुनाट विकारांसारख्या जठरांत्रविषयक समस्यांशी संबंधित आहे, ज्या ऑटिझम असलेल्या मुलांमध्ये सामान्यतः दिसून येतात. कालांतराने, आतड्यांच्या या समस्या अधिक गंभीर होऊ शकतात आणि गंभीर वर्तणुकीय आव्हानांना कारणीभूत ठरू शकतात. विष्ठेतील सूक्ष्मजीवांवर आधारित उपचारपद्धती जागतिक संशोधनात आशादायक परिणाम दर्शवत आहेत आणि यासाठी अधिक व्यापक व केंद्रित तपासणीची आवश्यकता आहे.”

रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशनच्या उद्दिष्टाबद्दल बोलताना, डॉ. चंद्रशेखर थोडुपुनुरी म्हणाले, “या समस्या सरकारी अधिकारी आणि धोरणकर्त्यांच्या निदर्शनास आणून देणे, तसेच या क्षेत्रांमध्ये अधिक संशोधन आणि धोरणात्मक कृतीसाठी पाठपुरावा करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, फाउंडेशनने ऑटिझम असलेल्या मुलांमधील आतड्यांच्या आरोग्याच्या पद्धतींचे मूल्यांकन करण्यासाठी देशव्यापी प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये माध्यमांशी संवाद साधून जनजागृती करणे, जनजागृती शिबिरे आयोजित करणे आणि मोफत आतड्यांच्या आरोग्याची तपासणी व मायक्रोबायोम चाचणी उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे. या उपक्रमांमधून निर्माण होणारा डेटा धोरणकर्त्यांना माहिती देण्यासाठी आणि पुराव्यावर आधारित उपाययोजनांना मार्गदर्शन करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. याशिवाय, आम्ही देशभरात एफएमटी केंद्रे उघडण्यासाठी रुग्णालयांशी करार आणि सहकार्य करण्याच्या शोधात आहोत, जेणेकरून मुलांना थेरपीसाठी प्रवास करण्याची गरज भासणार नाही.”

एफएमटी उपचारपद्धतीविषयी स्पष्टीकरण देताना डॉ. चंद्रशेखर थोडुपुनुरी म्हणाले, एफएमटी उपचारपद्धतीमुळे बद्धकोष्ठता, पोट फुगणे किंवा अन्नाची असहिष्णुता यांसारख्या पचनाशी संबंधित प्रमुख समस्यांवर उपाय करता येईल; ज्यांचा सामना अनेक ऑटिझमग्रस्त मुलांना करावा लागतो. एफएमटी ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे, ज्यामध्ये आतड्यांमधील सूक्ष्मजीवांचे  संतुलन पूर्ववत करण्यासाठी, एखाद्या दात्याच्या मलातील निरोगी जिवाणू रुग्णाच्या पचनसंस्थेत स्थानांतरित केले जातात. आतड्यांशी संबंधित विशिष्ट विकारांवर उपचार करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो; तसेच मज्जासंस्थेशी आणि चयापचय प्रक्रियेशी संबंधित विकारांमध्येही या उपचारपद्धतीचे संभाव्य फायदे लक्षात घेऊन तिचा वापर केला जात आहे.”

ऑटिझमच्या मूळ कारणाबद्दल स्पष्टीकरण देताना, डॉ. चंद्रशेखर थोडुपुनुरी म्हणाले, “ऑटिझमची सुरुवात गर्भाशयातच होते. गर्भधारणेनंतरच्या पहिल्या काही दिवसांसह, संपूर्ण गर्भधारणेदरम्यान घडणाऱ्या घटनांशी ऑटिझमचा संबंध जोडला गेला आहे. वाढणाऱ्या गर्भाला विषमुक्त वातावरण दिल्यास ऑटिझम नसलेले निरोगी बाळ जन्माला येऊ शकते. ऑटिझमचे निर्मूलन करण्यासाठी, रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशनने एक प्रतिबंधात्मक प्रोटोकॉल देखील सादर केला आहे, ज्याचे पालन प्रत्येक गर्भवती महिलेने करणे आवश्यक आहे. जन्मापासूनच ऑटिझमचे निर्मूलन करण्याच्या या मोहिमेत, ऑटिझमग्रस्त मुलांचे पालक असलेल्या डॉक्टरांनी आपला स्वतःचा व्यवसाय सोडून रिस्प्लाइससोबत हातमिळवणी केली आहे. अमेरिकेत प्रॅक्टिस करणाऱ्या दंतवैद्य डॉ. कलारम्या मारेपल्ली यांनी आपल्या साडेसात वर्षांच्या मुलासाठी सर्व काही सोडून, आपला व्यवसाय मागे सोडून भारतात परत आल्या, आपल्या मुलावर उपचार घेतले आणि नंतर त्याचे परिणाम पाहून या चळवळीत रिस्प्लाइसऑटिझम रिसर्च फाउंडेशनमध्ये सामील झाल्या. हे संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या उपचारांवर पालकांचा विश्वास असल्याचे सिद्ध करते. त्यामुळे ही संस्था केवळ डॉक्टरांद्वारे चालवली जात नाही, तर ती पीडित आणि प्रभावित पालकांद्वारे देखील चालवली जाते, जे स्वतः देखील या चळवळीचा भाग आहेत.” डॉक्टर्ससुद्धा आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रात रिक्त जागा भरण्यासाठी बीएमएस, बीबीएसाठी सीईटीच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत

मुंबई: बीएमएस, बीबीए, बीसीए आणि एकात्मिक एमबीए सारख्या अभ्यासक्रमांसाठी सीईटी-आधारित प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर दोन वर्षांनी, राज्य सरकारने रिक्त जागा आणि प्रक्रियेतील...

वाढीव प्रवेश परीक्षेच्या शुल्कावरून एसपीपीयूमध्ये विद्यार्थी संघटनेने संप सुरू केला आहे

पुणे : नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) ने बुधवारी एसपीपीयूमध्ये प्रवेश परीक्षा शुल्क कमी करावे, अतिरिक्त क्रेडिट कोर्सेस ऐच्छिक केले जावे...

उल्हासनगर महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या गटनेत्या अंजली साळवे यांची निवड : शिवसेनेचे मानले आभार

उल्हासनगर दि २३ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेत्या अंजली साळवे यांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा बुधवारी महासभेत...

आयपीएल: एमआयने डॅनिशचा प्रभाव उप म्हणून वापरल्यानंतरही शार्दुल ठाकूर फलंदाजीला का आला – स्पष्टीकरण

शार्दुल ठाकूर गुरुवारी आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध त्याच्या संघाच्या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्ससाठी फलंदाजीसाठी आला.विशेष म्हणजे, शार्दुल ठाकूर मुंबईच्या...

अंतिम वापरकर्ते आणि गुंतवणूकदारांसाठी लखनौमधील शीर्ष 5 उच्चभ्रू निवासी परिसर

अलीगंज हा एक प्रस्थापित परिसर आहे आणि त्यात मध्यवर्ती निवासी मालमत्ता आहेत ज्यांना चांगले कनेक्शन आणि सहज प्रवेश मिळतो. हा परिसर बाजारपेठेपासून शैक्षणिक संस्था,...

error: Content is protected !!