Homeशहरएसएसटी महाविद्यालयत ‘कवितेतला भीमराव’ गीत कवितांच्या मैफिलीतुन समाजजागर.

एसएसटी महाविद्यालयत ‘कवितेतला भीमराव’ गीत कवितांच्या मैफिलीतुन समाजजागर.

  • एसएसटी महाविद्यालय आणि स्मार्ट फाउंडेशन आयोजित

उल्हासनगर दि .१८ : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त, स्मार्ट फाउंडेशन आणि एस.एस.टी. महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘कवितेतला भीमराव’ या आगळ्यावेगळ्या गीतकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक जाणिवा जागवणारा हा कार्यक्रम एस.एस.टी.महाविद्यालयाच्या सभागृहात रसिकांच्या उस्फूर्त उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे आणि महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी यांच्या हस्ते झाले. तर, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या व स्मार्ट फाउंडेशनच्या अध्यक्षा वसुंधरा मोरे-केदारे होत्या. सुप्रसिद्ध गीतकार डॉ.विनायक पवार आणि कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांचे कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमात अंबरनाथ नगर परिषदेच्या माजी नगरअध्यक्षा मनीषा वाळेकर, जिजाऊ सावित्री रमाई प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष मनोज शेलार, नाना पवार (म.प्र. प्रदेश सचिव, रिपाई आठवले गट), साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश जाधव, मा. कार्यकारी अभियंता दिलीप बागुल आणि उपप्राचार्य प्रा.डॉ.दिपक गवादे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ विधीतज्ञ दिलीप वाळंज यांना ‘ब्लू सन्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

गायक आय. एम.मोरे, भारत अंबवणे, शाहीरा ऐश्वर्या पवार यांची साऊ, वैशाली पगारे याची भिमराज की बेटी,आणि सचिन सरदार यांनी सामाजिक चळवळीवर आधारित भावस्पर्शी गीतगायन केली. तर राज असरोंडकर यांच्या अनोखी भीमवंदनेने  रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सुवर्णा अहिरे, प्रा. प्रफुल केदारे आणि प्रा.वृषाली विनायक यांनी उत्तमरित्या पार पाडले. भारावून टाकणाऱ्या निवेदन शैलींमुळे संपूर्ण कार्यक्रम प्रवाही झाला.

काव्यवाचन सत्रात कवी जितेंद्र लाड, मंगेश सरदार, डॉ. नरसिंग इंगळे, श्रीकांत बागुल, किरण भिलारे, सोनाली जाधव आणि प्रा. डॉ. दीपक गवादे यांनी सामाजिक विषयांवर प्रभावी कविता सादर केल्या. या कवितांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, समतेचा मूलमंत्र आणि नवभारताची दिशा ठळकपणे समोर आली.

‘कवितेतला भीमराव’ हे कविसंमेलन म्हणजे केवळ साहित्यप्रेमींना दिलेले पर्व नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने उचललेले प्रभावी पाऊल ठरले. कवितांच्या माध्यमातून विचारांची मशाल प्रज्वलित करणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ तेवत राहील, यात शंका नाही अशी भावना अरुण म्हात्रे व्यक्त केली.

तर, ‘कवितेतला भीमराव’ हे कविसंमेलन म्हणजे एक वैचारिक सांस्कृतिक परिवर्तनाची सुरुवात आहे. अशी प्रतिक्रिया उद्घाटक व एस एस टी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी यांनी यावेळी व्यक्त केली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

‘विश्वास बसत नाही’: वैभव सूर्यवंशी चकित झाल्यामुळे इंग्लंडचा माजी कर्णधार

वैभव सूर्यवंशी (एएनआय फोटो) इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने अलीकडच्या काही महिन्यांत या तरुणाची प्रभावी वाढ असूनही आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या T20I सामन्यासाठी किशोरवयीन...

BMC engrs ने पदोन्नती नाकारली; चौकशीची मागणी केली

मुंबई: किमान दोन कार्यकारी अभियंता आणि आठ सहाय्यक अभियंत्यांनी अनुक्रमे उपमुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंता या पदांवर पदोन्नती नाकारली, पात्र असूनही, तर...

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकऱ्यांनी शेततळे तयार करण्यास सुरुवात केली

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

आजची तुर्की म्हण: “एक गोड जीभ त्याच्या छिद्रातून साप काढू शकते.” – सौम्य शब्दांनी...

दिवसाची तुर्की म्हण (गुगल मिथुन द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) सापाला त्याच्या छिद्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असलेले चित्र. ते लपलेले, सावध आणि चावण्यास...

error: Content is protected !!