Homeशहरउल्हासनगर शहरातील थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी मे. आद्यंता बी2बी सोल्युशन्स प्रायव्हेट...

उल्हासनगर शहरातील थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी मे. आद्यंता बी2बी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड संस्थेची नियुक्ती

उल्हासनगर दि. ५ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात मालमत्ता धारकांकडे थकबाकी प्रलंबित असल्याने याशिवाय त्यांना वारंवार विनंती करूनही मालमत्ता कराची भरणा करत नसल्याने आता उल्हासनगर महानगरपालिकेने मालमत्ता कराची प्रलंबित थकबाकी वसूल करण्यासाठी मे. आद्यंता बी2बी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची नियुक्ती केली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्राद्वारे उल्हासनगर महापालिकेचे कर निर्धारक व संकलक नीलम चंद्रकांत कदम यांनी दिली आहे

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात मालमत्ता कराची मागणी नुसार वसुलीचे प्रमाण खुपच कमी प्रमाणात आहे. मालमत्ता कर धारकांना विविध माध्यमांव्दारे जाहिर आवाहन, सूट देणेकामी विविध योजना यांचा अवलंब करुन देखिल नागरीकांचा मालमत्ता कराचा भरणा करणेबाबत कल दिसुन येत नाही. त्यामुळे महापालिकेस अपेक्षित असलेल्या मालमत्ता कराच्या उत्पन्नात वाढ दिसुन येत नाही. उल्हासनगर महानगरपालिका मालमत्ता विभाग करापोटी मोठया प्रमाणावर थकबाकी प्रलंबित असल्याने मे. आद्यंता बी2बी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड संस्था यांना उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कर विभागातील वर्षानुवर्षे थकबाकीचा भरणा करत नसलेल्या करदात्यांना दुरध्वनीव्दारे कराचा भरणा करणेसाठी संपर्क साधणे, करदात्यांना मालमत्ता कर भरण्याच्या सर्व संभाव्य पध्दती आणि मालमत्ता कर कसा अदा करावा याबद्दलचे मार्गदर्शन करणे, मालमत्ता कराचा भरणा करु शकतील अशी संभाव्य तारखेला भेट देवून रक्कम जमा करणे, मालमत्ता कराचा भरणा अयशस्वी झाल्यास त्याबाबतचे फॉलोअपसाठी कॉल बॅक करणे इत्यादी कामकाजासाठी मालमत्तांच्या कराची वसुलीकामी नियुक्ती करण्यात आली आहे.

तरी मे.आद्यंता बी2बी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड संस्था हि या  मोबाईल क्रमांकावरुन (1)7030054808 (2)7218048302 (3)7350358426 (4)8308014403 (5) 8408002563 नागरिकांना कॉल करुन मार्गदर्शन करणार आहे. नागरीकांनी संबंधित कॉलवर सकारात्मक प्रतिसाद देवून सहकार्य करावे असे आव्हान उल्हासनगर महानगरपालिका कर निर्धारक व संकलक निलम चंद्रकांत कदम यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘ते बेकायदेशीर असेल तर…’: जर्मनीच्या विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर व्हीएआरची निंदा करताना क्लॉपने आर्सेनलला लक्ष्य...

जर्मनीचा जोनाथन टाह, दुसरा डावीकडे, विश्वचषक सामन्यादरम्यान नंतर नामंजूर केलेला गोल केल्यानंतर आनंद साजरा करत आहे. (एपी फोटो) जर्मनीच्या वादग्रस्त फिफा विश्वचषक 2026...

बीएमसीने ट्रॉम्बेमधील 7 अनधिकृत शाळांच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला आहे

मुंबईच्या बीएमसी शिक्षण विभागाने ट्रॉम्बे येथील सात अनधिकृत प्राथमिक शाळांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मुंबई : शिक्षण विभागाने वारंवार नोटीस बजावूनही ट्रॉम्बे...

महाराष्ट्र घाट, लोणावळा, ताम्हिणी लॉगवर मान्सूनचे पुनरुज्जीवन | तिप्पट-अंकी पाऊस | पुणे बातम्या

IMD च्या स्थानिक अंदाजानुसार पुणे शहरात 1 जुलै रोजी सामान्यतः ढगाळ आकाश आणि त्यानंतर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे :...

H-1B व्हिसा: यूएस कोर्टाने $100,000 H-1B शुल्क रोखले: भारतीय प्रवासी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी याचा...

एका मोठ्या कायदेशीर अपडेटमध्ये, यूएस फेडरल कोर्टाने $100,000 H-1B व्हिसा शुल्क अवरोधित करण्याचा निर्णय दिला आहे, त्याला एक बेकायदेशीर कर म्हटले आहे...

पीएमसीच्या घोषणेला आठवडा उलटूनही नवीन पाण्याचे टँकर भरण्याचे ठिकाण अद्याप सुरू झालेले नाहीत

पाण्याचे टँकर भरण्याचे ठिकाण पुणे : एका आठवड्यापूर्वी जाहीर केलेले अतिरिक्त पाणी टँकर भरण्याचे ठिकाण नागरी प्रशासनाने अद्याप कार्यान्वित केलेले नाही, जरी अधिका-यांनी...

error: Content is protected !!