Homeशहरउल्हासनगर गारमेंट फेअर 3.0 च्या समारोपाला उद्योगमंत्री संजय सावकारे यांची भेट :...

उल्हासनगर गारमेंट फेअर 3.0 च्या समारोपाला उद्योगमंत्री संजय सावकारे यांची भेट : आयोजकांच्या प्रयत्नांचे कौतुक

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या वस्त्रोद्योगाला नवी दिशा देणाऱ्या उल्हासनगर गारमेंट फेअर (UGF) 3.0 च्या समारोपाच्या दिवशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री संजय सावकारे यांनी मेळ्याला भेट देत विविध स्टॉल्सची पाहणी केली. यावेळी उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वाधारीया ,सिंधू शर्मा, विनोद माखीजा यांच्यासह उद्योग, व्यापार क्षेत्रातील मान्यवर तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळ्यात प्रदर्शित करण्यात आलेले आधुनिक परिधान, नव्या फॅशन डिझाइन्स आणि स्थानिक उद्योजकांचे नावीन्यपूर्ण उत्पादन पाहून उद्योगमंत्री संजय सावकारे यांनी समाधान व्यक्त केले. उल्हासनगरचा गारमेंट उद्योग केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारचे उद्योगाभिमुख मेळे स्थानिक उद्योगांना चालना देण्याबरोबरच व्यापार, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी सांगितले की, उल्हासनगर गारमेंट फेअर हे शहराच्या वस्त्रोद्योगाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणारे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. आयोजकांनी केलेल्या नियोजनबद्ध आणि यशस्वी आयोजनाचे त्यांनी कौतुक केले. उद्योगांच्या विकासासाठी तसेच व्यापाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यंदाच्या UGF 3.0 ची “Bigger, Better, Bolder” ही संकल्पना विशेष आकर्षण ठरली. देशभरातून आलेले व्यापारी, खरेदीदार आणि उद्योग प्रतिनिधींनी मेळ्यात सहभागी होत नव्या व्यावसायिक संधींचा शोध घेतला. आधुनिक फॅशन ट्रेंड, उच्च दर्जाचे परिधान आणि नावीन्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन यामुळे मेळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समारोप प्रसंगी उद्योगमंत्री संजय सावकारे, आमदार कुमार आयलानी आणि उपस्थित मान्यवरांनी यशस्वी आयोजनासाठी सर्व आयोजक, प्रदर्शक, व्यापारी आणि सहभागींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. आगामी काळात उल्हासनगर गारमेंट फेअर अधिक व्यापक आणि भव्य स्वरूपात आयोजित होऊन शहराच्या गारमेंट उद्योगाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी उंची प्राप्त करून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोशी दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्याने समिती स्थापन केली, पीसीएमसीने शहर आणि पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता...

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (पीसीएमसी) प्रशासकीय इमारतीवर 8 जुलै रोजी झालेल्या मोशी कचरा ते ऊर्जा प्रकल्पातील दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने...

ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचा पुनर्विकास होणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मध्यवर्ती रुग्णालय नव्याने उभारणीसाठी जलदगतीने विकास आराखडा तयार करावा - खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे कामगार रुग्णालयाची क्षमता वाढवून सहा महिन्यात लोकार्पण होणार उल्हासनगर दि....

स्वत:हून सूचनेनंतर एनजीटीने मोशी दुर्घटनेवर नागरी संस्था, प्रदूषण मंडळाकडून उत्तर मागवले

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित वेस्ट-टू-एनर्जी (डब्ल्यूटीई) प्लांटची तीन मजली प्रशासकीय इमारत मोशी येथील कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने घटनास्थळावरील ढिगारा हटवत आहे. पुणे : नॅशनल...

ज्ञानदा विद्या मंदिरात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने उजळल्या जुन्या आठवणी

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी ) :- शाळेच्या प्रांगणात रंगलेला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हा एक अत्यंत भावुक आणि आनंददायी सोहळा असतो.वर्षानुवर्षानंतर जुन्या...

कबाला की फिफाचे नियम? मेस्सीचा अर्जेंटिना इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीसाठी ‘लकी’ नेव्ही ब्लू जर्सी...

जॉर्डन विरुद्ध नेव्ही ब्लू जर्सीमध्ये लिओनेल मेस्सी (प्रतिमा: एक्स) गतविजेता अर्जेंटिना FIFA विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडबरोबर आणखी एक ब्लॉकबस्टर शत्रुत्वासाठी सज्ज...

error: Content is protected !!