Homeशहरउल्हासनगरात स्वराज्य संघटनेच्या वतीने आयोजित जाहीर व्याख्यान कार्यक्रम उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात...

उल्हासनगरात स्वराज्य संघटनेच्या वतीने आयोजित जाहीर व्याख्यान कार्यक्रम उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न

उल्हासनगर दि.४ : स्वराज्य संघटनेचे वतीने उल्हासनगरात  जाहीर व्याख्यान कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते मा. निरंजन टकले आणि मा. किरण सोनवणे यांनी समकालीन सामाजिक प्रश्न, बदलती राजकीय परिस्थिती, संविधानिक मूल्ये आणि समाजासमोरील विविध आव्हाने यांवर सखोल मार्गदर्शन केले. दोन्ही मान्यवरांनी विषयाला पूर्ण न्याय देत उपस्थितांना विचारप्रवर्तक आणि अभ्यासपूर्ण मांडणी करून महत्त्वपूर्ण संदेश दिला.

कार्यक्रमाचे आयोजक स्वराज्य संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अॅड. जय गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महापुरुषांच्या जयंती केवळ नाच-गाण्यापुरत्या मर्यादित न ठेवता समाजाला बौद्धिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, प्रबोधन आणि विचारजागृतीच्या माध्यमातून साजऱ्या केल्या पाहिजेत. समाजात वैचारिक परिवर्तन घडवून आणणे हीच महापुरुषांना खरी अभिवादनाची भावना असल्याचे त्यांनी नमूद केले.

सदर कार्यक्रमात आरक्षण उपवर्गीकरणालाही ठाम विरोध नोंदविण्यात आला. “माझा आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध आहे” या संदेशाचा सेल्फी स्टँड हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. अनेक नागरिकांनी सेल्फी स्टँडसमोर छायाचित्रे काढून आरक्षण उपवर्गीकरणाविरोधातील आपली भूमिका स्पष्टपणे व्यक्त केली. या जाहीर व्याख्यानाला हजारो नागरिक, युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते आणि विचारप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. कार्यक्रमाने सामाजिक जागृती, वैचारिक प्रबोधन आणि संविधाननिष्ठ समाजनिर्मितीचा संदेश प्रभावीपणे दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारत अ विरुद्ध श्रीलंका एक अनौपचारिक कसोटी: ध्रुव जुरेल आणि शेख रशीद यांनी दुसऱ्या...

IND A वि SL A: भारत अ संघ गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंका अ विरुद्ध 333/4 वर कमांडिंग पोझिशनमध्ये पहिल्या अनधिकृत कसोटीचा दुसरा दिवस पुन्हा...

मुंबई लोकल हत्या: आरोपी रोशन सुवर्णा दारूच्या नशेत घरी आला, सहप्रवाशाची हत्या करून रडला

नुकत्याच झालेल्या मुंबईच्या ट्रेनमध्ये झालेल्या चाकूने आरोपीच्या कुटुंबाला धक्का बसला आहे, ज्यांचा दावा आहे की तो दारूच्या नशेत आणि अस्वस्थ होऊन घरी धडकला...

‘ती दोषी असेल तर तिला त्याच गडावरून फेकून द्या’; केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी...

व्यापारी केतन अग्रवाल यांच्या कथित हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयलची आई पूजा गोयल यांनी गुरुवारी आपल्या मुलीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पुणे: व्यापारी...

नोएडा विरुद्ध युरोप: ‘नोएडा युरोपपेक्षा चांगला आहे’: भारतीय प्रवाश्यांच्या वक्तव्यामुळे स्वीडन, जर्मनी आणि ऑस्ट्रियावर...

इंस्टाग्रामवर एका भारतीय प्रवाशाची युरोपियन ठिकाणांबद्दलची वैयक्तिक पोस्ट व्हायरल होत आहे. परंतु प्रवासी अनमोल रैना (@anmolraina13) च्या व्हिडिओने “नोएडा युरोपपेक्षा चांगले आहे”...

मुंबई आणि पुण्यात पाणी साचल्याने सुप्रिया यांनी भाजपवर निशाणा साधला

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचले आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ताथवडे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक विस्कळीत...

error: Content is protected !!