Homeशहरउल्हासनगरात छत्रपती शिवाजी महाराज शिवकालीन शस्त्रे, गडकिल्ले व नाणी प्रदर्शन: पहिल्याच दिवशी...

उल्हासनगरात छत्रपती शिवाजी महाराज शिवकालीन शस्त्रे, गडकिल्ले व नाणी प्रदर्शन: पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

  • शिवकालीन शौर्याचा जिवंत अनुभव
  • शाळेतील विद्यार्थ्यांची प्रदर्शनाला तुफान गर्दी

उल्हासनगर दि. २० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शिवसेना शहर शाखेच्या वतीने ऐतिहासिक प्रदर्शन विठ्ठलवाडी स्टेशन रोड जवळील वेदांत महाविद्यालयाच्या मैदानावर तीन दिवस २०, २१  आणि २२ या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. तीन दिवसीय भव्य ऐतिहासिक प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या आणि स्वराज्य स्थापनेची गाथा उलगडणार्‍या या प्रदर्शनामुळे शहरात इतिहास आणि शौर्याची झलक अनुभवायला मिळत आहे . शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, आमदार बालाजी किणीकर, माजी आमदार पप्पू कलानी आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रदर्शनास शिवकालीन गड, किल्ल्यांचा आकर्षक प्रतिकृती, विविध शास्त्राचे तसेच प्राचीन नाण्याचे दर्शन घेता येणार आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि त्यांचा शौर्याचा इतिहास नागरिकांसमोर जिवंत स्वरूपात उभा राहणार आहे. प्रदर्शनाला इतिहास प्रेमी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देत आहेत.

प्रदर्शनादरम्या शिवकालीन युद्ध कौशल्य, गड किल्ल्यांची रचना तसेच त्या काळातील चलन व्यवस्था याबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना इतिहासाचा अभ्यास करण्याची आणि तो प्रत्यक्ष अनुभवायची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे . सकाळी १०  ते रात्री १०.००  वाजेपर्यंत खुले असलेल्या या प्रदर्शनाला  पाहिलायचं  दिवस मोठी गर्दी पाहायला मिळाली. हा कार्यक्रम शिवसेना महानगर प्रमुख तसेच नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, आमदार बालाजी किणीकर, महापौर, मा.आमदार पप्पू कलानी , शिवेसेना गटनेते अरुण आशान तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी शिवेसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे म्हाणाले राजेंद्र चौधरी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील गड किल्ले, नाणी शस्त्र यांचे प्रदर्शन ठेवले आहे. आपली जीं संस्कृती आहे, परंपरा आहे ती टिकवण्याच्या बरोबरच आपला जो ठेवा आहे, तो ठेवा नवीन पिढीला पाहता यावा आणि त्यांना त्याची माहिती व्हावी आणि त्यांचा उपयोग काय होता, आणि त्याचा उपयोग आता या जमानामध्ये होऊ शकत नसेल पण आपली परंपरा त्यांना माहिती असणे आवश्यक आहे आणि त्याच्यातून बोध घेण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. असे ते म्हाणाले .

त्यावेळी गोपाळ लांडगे यांनी आपला जो ठेवा आहे जी परंपरा आहे आणि त्या काळातील जे काही आपला वारसा आहे, तो वारसा जपण्याच्या दृष्टीने त्याचं महत्त्व माहिती होण्याच्या दृष्टीने ही माहिती करून घेण्यासाठी नुसतं त्यांना लेक्चर देण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून त्यांना दाखवणं आवश्यक आहे. त्यादृष्टीने या प्रदर्शनाचं खूप महत्त्व आहे, हे महत्त्व जाणून युवकांनी त्याबद्दल त्यामधून ज्ञान प्राप्त करावा असे आवाहन यांनी केले.

राजेंद्र चौधरी यांनी सांगितले उल्हासनगर शिवसेना शहर शाखेच्या वतीने या उल्हासनगर शहरांमध्ये शिवकालीन शस्त्र प्रदर्शन व नाणी प्रदर्शन हा प्रदर्शन या ठिकाणी  ठेवण्यात आलेला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालेला आहे. शहरातील ज्या काही शाळा आहेत, त्या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी त्या प्रदर्शनामध्ये येऊन त्याची पाहणी करतायेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या वेळेला जे शस्त्र वापरले होते त्या शास्त्राचे प्रदर्शन या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. आणि त्या प्रदर्शनामधून येणाऱ्या पिढीला भविष्य घडवणारे या पिढीला खूप काही घेता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेला त्यांनी कोणती शस्त्र वापरली ,त्यानंतर त्यांनी कोणती नाणी त्या काळामध्ये चलनात आणली आणि स्वराज्य स्थापन केलं आणि स्वराज्य स्थापन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही गडकिल्ले होते ते गडकिल्ले कोणते कोणते किल्ले आहेत आणि ते गड किल्ल्यांची माहिती या प्रदर्शनामध्ये आहे.या प्रदर्शनाचा उल्हासनगर  मधील शहरातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, शिवप्रेमी नागरिकांनी शिवसैनिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रात रिक्त जागा भरण्यासाठी बीएमएस, बीबीएसाठी सीईटीच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत

मुंबई: बीएमएस, बीबीए, बीसीए आणि एकात्मिक एमबीए सारख्या अभ्यासक्रमांसाठी सीईटी-आधारित प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर दोन वर्षांनी, राज्य सरकारने रिक्त जागा आणि प्रक्रियेतील...

वाढीव प्रवेश परीक्षेच्या शुल्कावरून एसपीपीयूमध्ये विद्यार्थी संघटनेने संप सुरू केला आहे

पुणे : नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) ने बुधवारी एसपीपीयूमध्ये प्रवेश परीक्षा शुल्क कमी करावे, अतिरिक्त क्रेडिट कोर्सेस ऐच्छिक केले जावे...

उल्हासनगर महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या गटनेत्या अंजली साळवे यांची निवड : शिवसेनेचे मानले आभार

उल्हासनगर दि २३ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेत्या अंजली साळवे यांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा बुधवारी महासभेत...

आयपीएल: एमआयने डॅनिशचा प्रभाव उप म्हणून वापरल्यानंतरही शार्दुल ठाकूर फलंदाजीला का आला – स्पष्टीकरण

शार्दुल ठाकूर गुरुवारी आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध त्याच्या संघाच्या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्ससाठी फलंदाजीसाठी आला.विशेष म्हणजे, शार्दुल ठाकूर मुंबईच्या...

अंतिम वापरकर्ते आणि गुंतवणूकदारांसाठी लखनौमधील शीर्ष 5 उच्चभ्रू निवासी परिसर

अलीगंज हा एक प्रस्थापित परिसर आहे आणि त्यात मध्यवर्ती निवासी मालमत्ता आहेत ज्यांना चांगले कनेक्शन आणि सहज प्रवेश मिळतो. हा परिसर बाजारपेठेपासून शैक्षणिक संस्था,...

error: Content is protected !!