उल्हासनगर दि. १ : – १ मे २०२६ रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५८८ वी जयंती मोठ्या उत्साहात धम्म पहाट समितीच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष टेकडी येथे भव्य असा आकर्षक देखावा उभारण्यात आला आहे.

शुक्रवारी १ मे रोजी सकाळी ९.३० वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध यांना आमदार बालाजी किणीकर, धम्म पहाट समितीचे अध्यक्ष प्रविण भगत, संजय वाघमारे आणि संविधान बहूद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भाई रोकडे तसेच वंचित नेते सारंग थोरात यांनी फुले अर्पण केली.

सुरुवातीला डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर चौकातच बोधिवृक्ष रोपाचे आमदारांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. आणि उपस्थित जनतेस पौर्णिमेनिमित्त खीरदान करण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार बालाजी किणीकर, उल्हासनगर महापालिकाचे उपमहापौर अमर लुंड, विरोधी पक्ष नेत्या अंजली साळवे, लता पगारे, अर्चना देशमुख, सुरेश देशमुख आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली. धम्म पहाट समितीचे उपाध्यक्ष संजय वाघमारे, रोशन गवई, अनंत सोनताटे वंचितचे सारंग थोरात, दिवाकर खळे, रेखाताई उबाळे संविधान बहूद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भाई रोकडे, निलेश भगत, विजय पवार, महेंद्र धांडे, आणि सिद्धार्थ बागडे आदींनी बुध्द जयंतीचा कार्यक्रम पार पाडला.





























