बदलापूर दि.१ :राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे महाराष्ट्र सचिव व बदलापूर प्रभारी शहराध्यक्ष श्री कालिदास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दिन व कामगार दिन कामगारांसोबत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कामगार या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

या वेळी बदलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे शहराध्यक्ष कालिदासजी देशमुख, दिव्यांग जिल्हा अध्यक्ष प्रीतम वानखेडे, सुशील धाहिंजे, यांनी सर्व कामगारांना एक प्रमाण पत्र वाटप केले. त्या अगोदर महाराष्ट्रातील हुतात्म्यांना व पहलगाम मधील दहशदवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी शहर प्रभारी कालिदास देशमुख. दिव्यांग सेलचे जिल्हा अध्यक्ष प्रीतम वानखेडे. सुशील धाहिजे, लक्ष्मण फुलवरे सायली बलित, विद्या बैसाणे, ज्योती वैद्य, स्मिता चटर्जी,. विद्या कदम, मंगल डोळस, कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राभकर शिंदे, उपाध्यक्ष सुधीर जाधव, संतोष खरात, इत्यादी. तसेच. सर्व कामगार व महिला कामगार राष्ट्रवादी चे कार्यकर्ते उपस्थित होते





























